शेतकरी हवालदिल : पाच शेळ्या गंभीर तर १२ शेळ्या किरकोळ जखमी
पोंभूर्णा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथे गोठ्याची भिंत कोसळल्याने तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. पाच शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत तर १२ शेळ्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. यात संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून तो आर्थिक संकटात सापडला आहे.
पोंभूर्णा तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. तान्हा पोळ्याच्या दिवशी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील पुरुषोत्तम मडावी यांच्या गोठ्याची भिंत कोसळून किशोर भीमाजी सोमनकार यांच्या मालकीच्या २० नग शेळ्यांपैकी ३ शेळ्यांचा मृत्यू झाला असून ५ शेळ्या गंभीर जखमी आहेत तर १२ शेळ्या किरकोळ जखमी झाले आहे. यामुळे सोमनकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बॉक्स
बऱ्याच ठिकाणी हानी
देवाडा खुर्द गावातील वसंत भुरसे व भैरू गव्हारे यांच्या घरांची भिंत कोसळली आहे. यात घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेत पिकाला सुद्धा पावसाचा फार मोठा फटका बसला आहे. सोयाबीन,पराटी, मिरची पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेत पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
080921\img-20210908-wa0056.jpg
जामखुर्द येथे गोठ्याची भिंत कोसळून तीन शेळ्यांचा मृत्यू