एक विद्यार्थिनी निलंबित : उच्च स्तरावरून प्रशासनाने घेतली दखलआशिष देरकर कोरपना‘नांदा परीक्षा केंद्र कॉपी बहाद्दारांचे विद्यापीठ’ या मथळ्याखाली सोमवारी ‘लोकमत’ला बातमी प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. आज (दि. ६) ला सकाळपासूनच प्रशासनाने सदर वृत्ताची दखल घेतली. शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील व त्यांच्या पथकांनी तब्बल तीन तास परीक्षा केंद्रावर घालवल्याने कॉपी बहाद्दारांचे धाबे दणाणून होते. तसेच तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्याही पथकाने परीक्षा केंद्रावर एन्ट्री केली. विविध पथकांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीने अख्ख्या परीक्षा केंद्रावर भयाण शांतता होती. शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने गिरी नावाच्या एका मुलीला निलंबित केले.कोरपना तालुक्यातील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा या परीक्षा केंद्रावर भरमसाट कॉपीचा प्रकार सुरु असतो. विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देतात. सध्या बारावीच्या परीक्षेत येथे खुलेआम कॉपी प्रकार सुरु असून संस्थाचालकाकडून लाखो रुपयांची कमाई सुरु आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कॉपी करून हमखास पास होण्याचे विद्यापीठ बनले आहे. अशा मजकुराची बातमी प्रकाशित झाल्याने शाळेत वादळापूवीर्ची शांतता होती. शिक्षण विभागाने या केंद्राकडे विशेष पथक नियंत्रण आणल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना विचारपूस केल्यानंतर चंद्रपूरसह नागपूर, वरोरा, बल्लारपूर, नांदेड, वाशीम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, माजरी, वणी, अशा विदर्भातील अनेक ठिकाणांहून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.प्रत्येक पेपरला येणार पथकविज्ञान शाखेचे रसायनशास्त्र व जीवशास्त्र असे दोन महत्वाचे पेपर शिल्लक असून प्रत्येक पेपरला उच्च स्तरावरील पथक येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या गोटातून मिळाली.भौतिकशास्त्र व गणिताच्या पेपरचे गुण तपासावेभौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी चालल्या. शिक्षण विभागाच्या कारवाईने गणिताच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉपी प्रकार चालला नाही. परीक्षा केंद्राची विश्वसनीयता तपासण्यासाठी निकालानंतर दोन्ही पेपरचे गुण तपासल्यास दिसून येईल.१७ नंबरचे इतके प्रवेश येतात कोठून?अख्ख्या तालुक्यात कोणत्याही शाळेत १७ नंबरचे प्रवेश देण्यात येत नाही. मात्र या शाळेत १७ नंबरचे प्रवेश देऊन हजारो रुपयांची वसुली विद्यार्थ्यांकडून केली जाते. नियमित विद्यार्थी नसल्याने प्रात्यक्षिक न दिल्याची व केंद्र चालकाला देण्याची वेगळी रक्कम परीक्षेच्या वेळी मागण्यात येते. मोठ्या प्रमाणात १७ नंबरचे प्रवेश देण्यात येतात. याचीही रितसर चौकशी व्हायला हवी.शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठेवले बाहेरपर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांसोबतच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी परीक्षा केंद्रावर हजर राहत होते. मात्र कारवाईच्या भीतीने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणिताच्या पेपरला बाहेर ठेवण्यात आले. बातमी प्रकाशित झाल्याने केंद्राबाहेर पत्रकाराला शिवीगाळ करून रोष व्यक्त करण्यात येत होता.विद्यापीठानेही घ्यावी दखलमार्च महिन्याच्या शेवटी विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत आहे. गडचिरोली विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व बी.एड. या परीक्षांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करून कॉपी प्रकार घडत असतो. त्यामुळे विद्यापीठानेही याची दाखल घ्यायला हवी.
परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांचा तीन तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2017 12:38 AM