यामध्ये जखमी झालेल्यांची नावे सुरेश गणपत बुले (५०) व अनुसया तुकाराम ठाकरे (६५) दोघेही रा. रुई व बिसन मनिराम बावणे (६५) रा.मुई असे आहे.
आता शेतीचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकरी सकाळच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी जात असतात. ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथील अनुसया ठाकरे व सुरेश बुले हे रुई शिवारातील आपआपल्या स्वतःच्या शेतात काम करीत होते. मुई शिवारात बिसन बावणे हे आपल्या शेतात काम करीत होते. अचानकपणे एक रानडुक्कर सैरावैरा पळत येत होता. त्या डुकराने अनुसया ठाकरे व सुरेश बुल्ले यांच्यावर हल्ला केला व त्यानंतर बीसन बावणे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर आजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या लोकांनी आरडाओरड केली असता डुक्कर पळून गेला. त्यानंतर जखमींना उपचार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.