शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

चना कटाईसाठी आलेल्या महिलांवर काळाची झडप, तिघींचा मृत्यू, १४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 11:41 PM

मजुरांची वाहतूक करणारी टाटा सुमो उलटली: सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ अपघात

नांद : चना कटाईसाठी आलेल्या महिला मजूर परतीच्या वाटेला असताना त्यांना घेऊन जाणारी टाटा सुमो गाडी अनियंत्रित होऊन उलटली. यात तिघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालकासह १३ महिला जखमी झाल्या आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्सी चौकी हद्दीतील सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागळे तिघीही रा. खरबी (माहेर) ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर अशी मृत महिलांची नावे आहेत.

सध्या उमरेड-भिवापूर तालुक्यात चणे कटाईचे काम सुरू आहे. मजुरांच्या आभावामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांची स्थानिक शेतकरी रोज ने-आण करीत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी रोज शंभर ते दोनशे किलोमीरचा जीव घेणा प्रवास हे मजूर करतात.

अशातच गुरुवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी (माहेर) जि. चंद्रपूर येथून चना कटाईसाठी वायगाव (गोंड) ता. उमरेड येथील शुभम राऊत यांच्या शेतात एम. एच.३३-ए-१९४७ टाटा सुमो गाडीमध्ये चालक पकडून एकूण १७ महिला मजूर आल्या होत्या.सायंकाळी काम आटोपल्यानंतर महिला मजूरांना घेऊन खरबी (माहेर) येथे परत जाताना सालेभट्टी गावाजवळील वळण मार्गांवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी होऊन रस्त्या शेजारच्या झाडावर आदळली. त्यात गाडीतील रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागळे यांचा जागीच मृत्यू झाला तर तन्वी विनोद मेश्राम (१९), दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत आडकिने, सोनाबाई सिंधू दुके, संध्या संतोष बाळगे, सरिता विजय नागपुरे, मनोरमा शांताराम मेश्राम, सावित्री बिसन आडकीणे, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अर्जुन बागडे व वाहनचालक शंकर मसराम हे जखमी झाले.

जखमींना नागपुरात हलविले

अपघात झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच चंद्रपूर जि.प.चे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनीही घटनास्थळी दाखल होत महिलांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सदर अपघाताची नोंद बेला पोलिसांनी घेतली आहे. अपघाताचा तपास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, बेला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव बाडगीरकर, कुणाल ठाकूर, बाबा नेवारे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात