शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

विविध अपघातात तिघे ठार ; दोन जखमी

By admin | Published: January 20, 2015 11:10 PM

तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गडचांदूर-राजुरा मार्गावर टिप्पलने दुचाकीला धडक दिली. यात आशिष विक्रम मडावी (१९) घटनास्थळीच ठार झाला.

चंद्रपूर : तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गडचांदूर-राजुरा मार्गावर टिप्पलने दुचाकीला धडक दिली. यात आशिष विक्रम मडावी (१९) घटनास्थळीच ठार झाला. दुसऱ्या घटनेमध्ये गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे दुध घेऊन येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार सिद्धार्थ वाळके ठार झाला. तर तिसऱ्या घटनेत चंद्रपूर बल्लारपूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.राजुरा-गडचांदूर मार्गावरील रेल्वे क्रासींगजवळ टिप्पर एमएच ३४ एम ५४७९ ने मोटरसायकल एमएच ३४ व्ही ७२२१ ला धडक दिली. यात दुचाकीवरील आशिष विक्रम मडावी (१९) रा. आवारपूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी देवानंद राजूरकर रा.चंद्रपूर हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई राजिक शेख व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.दुसऱ्या घटनेत पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरीवर असलेल्या सिध्दार्थ वाळके याला शासकीय नोकरी लागल्यामुळे तो बोरचांदली येथे १९ नोव्हेंबर रोजी जाण्यासाठी मूल येथे आला. गावाला जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्याने सिध्दार्थने गुलशन वाळके याला दुचाकी वाहन घेवून बोलावले. गुलशन वाळके तथा लखन मेश्राम हे दोघेही दुचाकी एम एच ३३ ए टी ३५४९ हे मूल येथे आले आणि सिध्दार्थ वाळकेला घेऊन बोरचांदलीकडे निघाले. दरम्यान, गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे दूध घेऊन जाणाऱ्या टाटा एस एम एच ३३जी १५७० ने धडक दिली. यात सिध्दार्थ वाळके (३२) रा. बोरचांदली याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गुलशन वाळके (२९) व लखन मेश्राम (२२) गंभीर जखमी झाले. मूल पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. आर. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीराम कुमरे, पोलीस शिपार्ई सुनील मेश्राम करीत आहे. (नगर प्रतिनिधी)