जिवती : तालुक्यातील महापंढरवणी हे गाव गोंडवाना विद्यापीठाने दत्तक घेतले आहे. महापंढरवणी या गावातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून गावातच स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी गोंडवाना विद्यापीठाने तीन लाख रुपये मंजूर केले आहेत.
कर्मयोगी बाबा आमटे उन्नत ग्राम अभियानांतर्गत दत्तक ग्राम महापांढरवणी येथे विविध योजना राबवून स्वंयरोजगार कसा निर्माण करून गावाचा विकास कसा करता येईल याविषयी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, याकरिता विदर्भ महाविद्यालय जिवती येथील प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांची समन्वयकपदी, तर एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. संजयकुमार देशमुख यांची सहसमन्वयकपदी नियुक्ती केली आहे. नियुक्त समन्वयक व सहसमन्वयक यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी चर्चा केली व गांडूळ खतनिर्मितीसाठी गावपातळीवर समिती गठित करण्यात आली.
याशिवाय महापांढरवणी गावाच्या सभोवताल जंगल असल्याने जंगलातील वनउपज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यापैकी मोहफूल हे जास्त प्रमाणात आहेत. त्यावर प्रक्रिया करून तसेच मत्स्यव्यवसाय करूनही गावात रोजगार निर्माण करता येतो, असेही निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
240921\img-20210924-wa0027.jpg
गोंडवाना विद्यापीठाकडून स्वंयरोजगर करिता ३ लाख मंजूर