आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : थकित मालमत्ता कराचा भरणा करण्याच्या सुचना देऊनही भरणा न केल्यामुळे मनपा जप्ती पथकाने मंगळवारी दुपारी तीन दुकानांना सील ठोकले. दरम्यान कराचा भरणा केल्यानंतर सील उघडण्यात आले.थकीत कर्ज वसुलीची मोहिम मनपाने युद्धपातळीवर सुरु केली आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमधील साहर अली आणि तिवारी यांनी कराचा भरणा केला नसल्याने मंगळवारी दुपारी सहायक आयुक्त शीतल वाकडे यांच्या नेतृत्वात पथक बाजार समितीत दाखल झाले. त्यानंतर दोन्ही दुकानांना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. चार लाख ४० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला. उर्वरित रक्कम काही दिवसात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सील उघडण्यात आले.वरोरा नाका परिसरातील दीक्षित यांचे महाकाली टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स आणि लाला गोलेच्छा यांचे नैवेद्य स्वीट मार्केट यांच्याकडे प्रत्येकी ८२ हजार रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे या पथकाने या दोन्ही दुकानांना सील ठोकले. श्रीकृष्ण टॉकीज परिसरातील एका दुकानावर जप्तीची कारवाई केली. यावेळी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, झोन सभापती भाऊराव सोनटक्के, पथक प्रमुख डुमरे, सुभाष ठोंबरे, नामदेव राऊत उपस्थित होते.
तीन दुकानांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:51 PM
थकित मालमत्ता कराचा भरणा करण्याच्या सुचना देऊनही भरणा न केल्यामुळे मनपा जप्ती पथकाने मंगळवारी दुपारी तीन दुकानांना सील ठोकले. दरम्यान कराचा भरणा केल्यानंतर सील उघडण्यात आले.
ठळक मुद्देथकित कर वसूली मोहीम : मनपाच्या जप्ती पथकाची कारवाई