तीन ट्रक मालकांकडून
दंड वसूल चंद्रपूर : परिसरातून कोळसा व राख अवैध वाहतूक करणाºया तीन ट्रकवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजता वाहनमालकांकडून चालकोंकडून १२ हजारांचा दंड वसूल केला. या मार्गावरून भरधाव वेगाने वाहन दामटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भानापेठ वार्डातील
नाल्यांची स्वच्छता करा
चंद्रपूर : भानापेठ वार्डातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराणआहेत. वार्डातील नाल्या उपसा काम संथ गतीने सुरू आहे. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना या वार्डात पाठवावे. शिवाय, रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू होणार
चिमूर : तालुक्यातील अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र,निधी न मिळाल्याने कामे रखळली आहेत. ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी पाठपुरावा केल्यामुळे निधी मंजूर झाला आहे. पंचायत समितीने यासंदर्भात आदेशाद्वारे कळविले. येत्या काही दिवसांपासून या कामांना सुरूवात होणार आहे.
हमीभावाने धानाची
खरेदी करावी
मूल : तालुक्यात धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नसल्याने त्यांना याच शेती केल्याशिवाय पर्याय नाही. यंदा बºयापैकी उत्पादन झाले. शासनाने धानाला हमीभाव जाहीर केला. त्यामुळे हमीभावानुसारच धान खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
अतिवृष्टीच्या निधीसाठी
शेतकºयांच्या चकरा
नागभीड : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही काही शेतकºयांना मिळाली नसल्याने शेतकºयांच्या तलाठी व तहसील कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. काही दिवसात नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन देवून अधिकारी मोकळे होत आहे. त्यामुळे शेतकºयांनानुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
घुग्घुस परिसरातील
रस्त्याची दुरुस्ती करावी
घुग्घुस : परिसरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली. बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून तातडीने दुरस्ती करणे गरजेचे आहे. औद्योगिक शहर म्हणून घुग्घूसची ओळख आहे. त्यामुळे येथे परिसरातून मोठ्या संख्येने वाहनधारक येतात. मात्र खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत.
चंद्रपूर-वणी मार्गावर बंदोबस्त वाढवा
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मद्यपी विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करत आहे. पण तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काही मद्यपी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
नाल्याचे बांधकाम
पूर्ण करावे
चंद्रपूर : नेहरूनगर रय्यतवारी परिसरात नाली बांधकाम न झाल्याने विविध वार्डात घाण पसरली आहे. या परिसरातील लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांमध्येही वाढ करणे गरजेचे झाले आहे. मनपा प्रशासनाने निधीची तरतूद करून नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रवाशी निवाºयाअभावी नागरिकांचे हाल
राजूरा : कोरपना व राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या निमणी, हिरापूर येथे प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. निमणी, हिरापूर येथील नागरिकांनी परिवहन महामंडळाकडे निवेदन दिले. पण, हा प्रश्न अद्याप सुटला नाही.
खताच्या ढिगाºयांमुळे घाणीचे साम्राज्य
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत साठविल्या जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. गावागावांत स्वच्छता अभियान राबवत असतानाच स्वच्छतेची ऐसीतैशी होत आहे. मात्र संबंधित विभागाकडून कारवाई झाली नाही.
नागभीड-वडसा मार्गावर आॅटो चालकांची मनमानी
ब्रह्मपुरी : नागभीड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो आॅटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने आॅटो चालकांची मनमानी वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पीक विम्यापासून
शेतकरी वंचित
वरोरा : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील टेमुर्डा गावातील नागरिक मोठ्या संख्येने शेती व्यवसाय करतात. मात्र यावर्षी खरीपामध्ये अतिपावसाने तसेच रब्बीमध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. खरीपाच्या पीक विम्याची अद्यापही शेतकºयांना मदत मिळाली नाही.
रोजगाराअभावी बेरोजगारांमध्ये नैराश
भिसी : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भिसीमध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे येथे बेरोजगारांची फौज वाढली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देवून येथे धानावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारून रोजगार द्यावा, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.
रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी
नवरगाव : परिसरातील नागरिकांसाठी बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या नवरगावमध्ये रस्ते अरुंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून गावातील अतिक्रमण हटवून रस्त्यांची रुंदी वाढवावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.