लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील तेजूराव वाघोबा पोरटे यांचे मालकीची जनावरे घराबाहेर चिंचेच्या झाड्याजवळ बांधून असताना रात्री पट्टेदार वाघाने बैलांना ठार केल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत स्थानिक बिटामध्ये पट्टेदार वाघाचा वावर असून पाळीव जनावरांना मस्त करीत आहेत. यापूर्वी बेंबाळ येथील गाय आणि बैलाला ठार केले. नुकताच काटवन येथे कळपावर हल्ला केले बचावासाठी पुढे सरसावलेल्या पुठ्ठावार या मेंढपाळाला ठार केले.घोसरी उपवन क्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने पाळीव प्राण्यांचा बळी घेत असून दि. ३० जानेवारी ला रात्री घराजवळच चिंचेच्या झाडाजवळ नेहमीप्रमाणे गुरे बांधून असलेल्या तेजूराव पोरटे यांच्या बैलांना वाघाने ठार केले.सध्या थंडीने कहर केला असल्याने गावकरी घरातच पांघरून घेतलेले असतात. त्यामुळे सदर घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात घराबाहेर बांधलेल्या बैलांवर वाघाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:58 AM
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील तेजूराव वाघोबा पोरटे यांचे मालकीची जनावरे घराबाहेर चिंचेच्या झाड्याजवळ बांधून असताना रात्री पट्टेदार वाघाने बैलांना ठार केल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देघोसरी उपवन क्षेत्रात वाघाचा धुमाकूळ