लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला लगतच्या माना टेकडी परिसरात काही दिवसांपासून वाघ व बिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.गुरूवारी बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरातील झुडपे कापावे आणि पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाघाने बैलावर हल्ला केल्याची माहिती मिळताच बुधवारी आमदार किशोर जोरगेवार, वेकोलि व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.गुरूवारी शेतकरी पोळे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर बैल जखमी झाला. शेतकºयांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, वनक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावार, वेकोलिचे क्षेत्रीय व्यवस्थापक हलदर आदींनी माना टेकडी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात नागरिकांनी शेतीची कामे करताना खबरदारी घ्यावे, असे आवाहन केले. संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील झूडपी झाडे तोडून पथदिवे लावण्याचे काम केले जाणार आहे.शेतकऱ्याला भरपाई द्यावीवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे माना टेकडीवर झुडपी जंगल वाढले. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गतवर्षीही अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.
माना टेकडी परिसरात वाघ-बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM
चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.
ठळक मुद्देशेतकऱ्याला भरपाई द्यावी