पळसगाव (पिपर्डा) : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगाव येथील बेलारा आणि गोंडमोहळी परिसरात गावालगत लागून असलेल्या वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुडपामध्ये भरदिवसा वाघाने ठाण मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी आपली शेतीची कामे करण्याकरिता गेले असता त्यांना वाघाचे दर्शन झाले. काही दिवस अगोदर पळसगाव येथे वाघिणीने एक इसम व एक वनकर्मचारी यांना जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा शेतकऱ्यांना वाघ शेतातील झुडपात दिसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता वनविभागाचे कर्मचारी व वनमजूर चारीही बाजूंनी गस्त घालत दिसल्याचे आढळले. काही शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे टाकून घरी जाणे पसंत केले. सायंकाळ झाली की वाघ जंगलाच्या दिशेने निघून जाईल, असा विश्वास त्यांना आहे. असे असले तरी वाघ गावाकडे येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी लोकांची मागणी आहे.
===Photopath===
270621\screenshot_2021-06-27-16-17-42-82.jpg
===Caption===
शेतशिवारात वाघाला शोध घेताना वनकर्मचारी व वनमजुर