लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चिमूर तालुक्यातल्या भान्सुली बिटातील पायवाटेवर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एका वाघाने बराच वेळ ठिय्या दिला. तिथून जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस ही बाब पडताच ती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. हा वाघ वृद्ध झाला असून त्याला आता शिकार करणे जमत नसल्याने तो गावाकडे वळला आहे अशी यावेळी गावकऱ्यांमध्ये चर्चा होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाघाची पाहणी केली. या पाहणीत त्याच्या पायाला जखम असल्याचे त्यांना आढळले. त्यावर उपचार करण्याच्या हेतूने वाघाला सुन्न करणारे इंजेक्शन देण्याची गरज असल्याने त्याकरिता वरिष्ठांकडे परवानगी मागण्यात आली आहे. ती परवानगी मिळताच वाघाला बेशुद्ध करून त्यावर उपचार केले जाणार आहेत. हा वाघ गुरुवारी दुपारपर्यंत तेथेच बसून होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातल्या पायवाटेवर वाघाने दिला रात्रभरापासून ठिय्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:58 PM
चिमूर तालुक्यातल्या भान्सुली बिटातील पायवाटेवर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एका वाघाने बराच वेळ ठिय्या दिला.
ठळक मुद्देपायाला जखम असल्याचे आढळले