लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना उपवनक्षेत्रातील शिवारावर वाघाची दहशत पसरली असून शेतात चरणाऱ्या वासरावर वाघाने हल्ला करून ठार केले. घटना बुधवारी घडली.मौजा कळमना तलाठी साजात वर्धा नदीच्या पट्टयात शेकडो एकर शेती असून या शिवारात मागील आठ दिवसांपासून वाघाने बस्तान मांडले आहे. शंकर महाकूलकर यांच्या मालकीचे जनावरे त्यांच्याच शेतात चरत असताना वाघाने हल्ला करून वासरला ठार मारले. याबाबत संबंधित वनकर्मचाºयांकडे तक्रार करण्यात आली. वनविभागाने ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून वाघाच्या अस्तित्वाची छायाचित्रे घेतली. नदी पट्टयात वाघ सतत फिरत असल्याने व रात्रदिवस वाघाचे दर्शन शेतकºयांना होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यासाठी कचरत आहेत. रात्री रानडुकराच्या हैदोसाने उभी पिके नष्ट होत आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व पीक वाचविण्यासाठी रात्रीची जागल आवश्यक आहे. मात्र शिवारावर रात्रदिवस वाघाची भ्रमंती असल्याने भीतीपोटी शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली आहे.रात्री लोडशेडींग करण्याची मागणीकोठारी ३३ केव्ही सब स्टेशनमधून कळमना, मानोरा, पळसगाव, किन्ही, कोर्टी, आमडी, इटोली व गिलबिली व कवडजई येथे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या वाघाची दहशत सर्वत्र असल्याने वीज वितरण कंपनीने दिवसाची लोडशेडींग बंद करून रात्री सुरू करावी व पाण्यावाचून पिकांना वाचवावे, अशी मागणी ज्ञानेश्वर लोहे, रमेश पिपरे यांनी मागणी केली आहे.उर्जाग्राम वसाहतीत वाघाचे दर्शनताडाळी : केंद्रीय कार्यशाळेच्या आरआरआरटी परिसरातून पट्टेदार वाघाने वसाहतीत शिरकाव केला आहे. वसाहतीतील अतिथीगृह व कैलाश चिकित्सालय परिसरात अनेकांना वाघाचे दर्शन झाले. ऊर्जाग्राम ताडाळीचे क्षेत्रीय वित्त प्रबंधक एम. एस. राजू व हैदराबादहून आलेले परीक्षक ऋषिकेश व राजस्थानहून आलेले परीक्षक अभिषेक अतिथीगृहातून रात्रीचे जेवण आटपून बाहेर निघाले व पायी चालत असताना अचानक त्यांना रस्त्यावर वाघाचे दिसला. या परिसरातील शेतीची कामे वाघाच्या दहशतीमुळे प्रभावित झाली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी उर्जाग्राम, ताडाळीवासीयांची मागणी आहे.महिलेवर हल्लासुशी दाबगाव : सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता कक्ष क्रमांक ५२५ मध्ये घडली. शालू घनश्याम उराडे (३७) असून ती आपला भाऊ जगोबा गोंगले यांच्यासोबत सुशी दाबगाव येथे राहते. गुरुवारी सकाळी शालू आणि अन्य तीन महिला जवळच्या जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेले होते. वाघाने अचानक हल्ला केला. यात शालू उराडे गंभीर जखमी झाल्या. इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने पळ काढला. शालू हिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
कळमना शिवारात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:00 PM
लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना उपवनक्षेत्रातील शिवारावर वाघाची दहशत पसरली असून शेतात चरणाऱ्या वासरावर वाघाने हल्ला करून ठार केले. घटना बुधवारी घडली.मौजा कळमना तलाठी साजात वर्धा नदीच्या पट्टयात शेकडो एकर शेती असून या शिवारात मागील आठ दिवसांपासून वाघाने बस्तान मांडले आहे. शंकर महाकूलकर यांच्या मालकीचे जनावरे त्यांच्याच ...
ठळक मुद्देवाघाच्या भीतीने शेतकामे प्रभावित