प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : तंबाखू सेवामुळे दररोज २५ हजार लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये असलेल्या विषारी निकोटीनमुळे तरूणांसह, आबालवृद्धही ग्रस्त आहे. तंबाखू सेवनामुळे आजपर्यंत हजारो लाखो तरूणांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू सेवन विरोधी कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.समाजात आज तंबाखू सेवानाचे घातक व्यसन जळले आहे. तंबाखूमध्ये निकोटीनचे प्रमाण अधिक असल्याने हे अत्यंत नशा आणणारे विषारी रसायन आहे. तंबाखू सेवन करणे शरीरासाठी घातक असून तंबाखूच्या जास्त सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने नागभीड येथील गटशिक्षणाधिकारी नाट व चंद्रपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भसारकर यांनी मोलाचे कार्य करीत चंद्रपूर पंचायत समितीमधील सरकारी व ३३६ खासगी शाळा तंबाखूमुक्त केल्या आहे. अंबुजा फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र बैस व लोखंडे आणि सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक निर्झर बरवे यांनी तंबाखू सेवन विरोधी उपक्रम राबवून जिल्ह्यात जनजागृती केली आहे.जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक जाहीर खान व हरीशचंद्र पाल यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान चंद्रपूर अंतर्गत अनेक शाळांमध्ये तंबाखू विरोधी कार्यक्रम घेऊन जनजागृती केली आहे.तंबाखू शरीरासाठी कसा घातक आहे हे पटवून दिल्यामुळे तंबाखू सेवनापासून दूर झालेल्या युवकांच्या आयुष्यातील निराशा संपवून आशेचा नवा किरण त्यांच्या आयुष्यात फुलवण्याचे कार्य तंबाखूविरोधी उपक्रमामुळे झाले आहे. तंबाखू सेवनामुळे दुर्धर आजार होऊन अनेकांचे आयुष्यच करपल्याने त्यांचे भावी आयुष्य मातीमोल झाले आहे. त्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे तंबाखू विरोधी उपक्रम जिल्ह्यातील तंबाखूग्रस्तांना नवसंजिवनी देणारा असून सामाजिक बांधिलकी जोपासत तंबाखू सेवनापासून नागरिकांनी दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.तंबाखू का घातक आहे?तंबाखू व तंबाखूच्या धुरात चार हजारांहून अधिक विषारी रसायने आहेत. तंबाखूमध्ये निकोटीनचे प्रमाण असल्याने ते शरीराला नशा आणते. तंबाखुमुळे अनेकांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना बळी पडावे लागते. त्यामुळे तंबाखूचे सेवन अतिशय घातक आहे.महाराष्ट्रामध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानात चंद्रपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त नागरिक करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यात तंबाखू विरोधी उपक्रम राबविणे सुरू आहे.- जाहीर खान, जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक, तंबाखूमुक्त शाळा अभियान, चंद्रपूर
तंबाखू सेवनाने लाखोंच्या आयुष्यात पसरला अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:33 PM
तंबाखू सेवामुळे दररोज २५ हजार लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये असलेल्या विषारी निकोटीनमुळे तरूणांसह, आबालवृद्धही ग्रस्त आहे. तंबाखू सेवनामुळे आजपर्यंत हजारो लाखो तरूणांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू सेवन विरोधी कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
ठळक मुद्देसलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात तंबाखू विरोधी कार्यक्रम