गोपालकाला १२ जानेवारीला : नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवारासह मान्यवरांची उपस्थितीपेंढरी (कोके) : चिमूर तालुक्यातील श्रीगुरुदेव साधनाश्रम गुंफा यात्रा महोत्सव समिती गोंदेडा, गावकरी व गुरुदेव कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा ५७ वा गोदेंडा गुंफा यात्रा महोत्सव ८ ते १२ जानेवारीपर्यंत आयोजित केला आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बालपणी गोंदेडा येथे येऊन साधना केली होती. त्या भूमीला पवित्र तपोभूमी म्हणून संबोधण्यात येते. तेथे राष्ट्रसंतांनी ५६ वर्षांपूर्वी भाकरीचा काला केला होता. आता या महोत्सवाला ५६ वर्षे पूर्ण होवून आता पौष पोर्णिमेला ५७ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पाच दिवसीय महोत्सवाला ८ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. यात गोपालकाल्याला केंद्रीय भूपृष्ठ, जल वाहतूक, परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी, वित्त नियोजन वन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार मितेश भांगडिया, आमदार किर्तीकुमार भांगडिया तर विशेष अतिथी म्हणून गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाशपंत वाघ, जि.प. च्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, चिमूर पं.स. सभापती वैशाली येसांबरे, उपसभापती विलास कोराम, जि.प. सदस्य गीता लिंगायत, दिनेश चिटनुरवार, पं.स. सदस्य वर्षा लोणारकर, गुंफा समिती अध्यक्ष अरुणा अडसोडे, गोंदोड्याचे सरपंच राजेंद्र धारणे, जितु होले आदी मान्यवर उपस्थित राहून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.त्यापूर्वी ध्यानावर दामोदर दडमल, बारसागडे महाराज, प्रेमदास मेंढुलकर, प्रल्हाद शेंबेकर, रविंद्र कुमार गुरुजी, गुलाब गायकवाड महाराज, सुधाकर पिसे, शंकर सोनवाणे, चेतन अवाडकर, प्राचार्य राम राऊत मार्गदर्शन करणार आहेत. कीर्तनकार सुधाकर चौधरी, गोवर्धन चन्ने, नामदेव बावणे, प्रा. चरडे व लक्ष्मदास काळे महाराज कीर्तन सादर करणार आहेत. (वार्ताहर)पाच दिवसांचे विविध कार्यक्रमांचे आयोजनसकाळी ग्रामसफाई, साप्ताहिक ध्यान, रामधून, घटस्थापना व कार्यक्रम मंचाचे उद्घाटन, श्रमदान, पशू रोगनिदान शिबिर, योग व प्राणायम शिबिर, कबड्डी, क्रिकेट, रांगोळी, ग्रामगीता पाठांतर, भजन, भावगीत, आरती गायन स्पर्धा, सायंकाळी सा. प्रार्थना, कीर्तन, संस्कार शिबिर, महिला मेळावा तथा महिला स्पर्धा आरोग्य शिबिर, श्रमसंस्कार शिबिर, नवीन कुटीचे लोकार्पण, युवक तथा कृषी मेळावा व सर्व स्पर्धाचे बक्षिस वितरण, भजन संध्या, भजन सभेला संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक, पालखी सत्कार सोहळा, पालखी श्रमदान यज्ञ, आधुनिक युगातील रोग व पंचगण्य चिकित्सा, गोपालकाला संकीर्तन, गुंफा यात्रा महोत्सव समितीची निवडणूक व शेवटी मान्यवरांचे मार्गदर्शन होईल.
आजपासून ५७ वा गुंफा यात्रा महोत्सव
By admin | Published: January 08, 2017 12:48 AM