शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

रक्तदान व वृक्षोरापण कार्यक्रमातून आज बाबूजींना आदरांजली

By admin | Published: July 02, 2017 12:33 AM

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त...

लोकमत-आयएमएचा उपक्रम : डॉक्टर्स डे अंतर्गत सामूहिक आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. २ जुलैला चंद्रपुरात रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.लोकमत जिल्हा कार्यालय आणि इंंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), आयुष ब्लड बँक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शहरातील अध्ययन भारती, युवा मित्र संघटना, पर्यावरण संवर्धन व विकास समिती, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान व नटराज डॉन्स ग्रूप अकादमीसह अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. २ जुलैला सकाळी ८ वाजता बायपास मार्गावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर व प्लास्टिक रिसायकलींग फॅक्टरी परिसरात वृक्षारोपणाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानंतर स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात सकाळी १० वाजता या रक्तदान शिबिराला सुरूवात होणार आहे. स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा तर पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, मनपाचे सभापती राहुल पावडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय करमटकर, सचिव डॉ. मनीष मुंधडा, डॉ. प्रकाश मानवटकर, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, डॉ. सुशांत नक्षिने, वर्षा कोठेकर उपस्थित राहणार आहेत. शिबिरासाठी वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिनिमित्त देशभरात १ जुलै हा डॉक्टर डे म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा डॉक्टर्स विक म्हणून पाळला जातो. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयएमएच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमए पदाधिकारी व सामाजिक संस्था या शिबिरासाठी सरसावल्या आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करून रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय करमरकर, सचिव डॉ. मनीष मुंदडा व चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अमोल कडुकर ९२७०१३१५८०, पूजा ठाकरे ९०११३२२६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व प्रथमोपचार कीट इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवित केले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना प्रथमोपचार कीट दिली जाणार आहे. लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहनबाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेतेबंधंूसह महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.