कोण मारणार बाजी : क्रीडा संकुल येथे सकाळी १० वाजतापासून मतमोजणी चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी २१ एप्रिल शुक्रवारला सकाळी १० वाजेपासून केली जाणार आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होणार असल्याने कोण बाजी मारणार याबाबत चंद्रपुरातील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे मतमोजणी होणार असून मनपा प्रशासनाने यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. गुरूवारी ३ लाखांवर मतदार असणाऱ्या चंद्रपूर शहरात रात्री उशिरा जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ५२.५६ टक्के मतदान झाले. मनपाच्या २०१२ मध्ये पार पडलेल्या झालेल्या पहिल्या निवडणुकीत ५७.७१ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मात्र उलट झाले असून गतवेळपेक्षा यावर्षी कमी टक्के मतदान झाले. शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणी संदर्भात जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आलेल्या तयारीचा महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संजय काकडे यांनी गुरूवारी आढावा घेतला. मतमोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)७० टेबल, ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीमहानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार २० एप्रिलला होणार आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील बॅडमिंटन सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. यासाठी ७० टेबल व ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजरपाच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात (आरओ) १७ प्रभागाची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक आरओ विभागासाठी प्रत्येकी १४ याप्रमाणे एकूण ७० टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याचे उपायुक्त विजय देवळीकर यांनी सांगितले.४६० उमेदवारांचा फैसलाशहरातील १७ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे असून रिंगणात भाजप ६६, काँग्रेस ६४, शिवसेना ६१, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ४३, बहुजन समाज पक्ष २९, चंद्रपूर महानगर रिपब्लिकन आघाडी २५, मनसे १७, भारिप बहुजन महासंघ १७ आणि अपक्ष १३८ असे ४६० उमेदवार रिंगणात होते.