लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.ही रॅली २६ जानेवारीला दुपारी २ वाजता जटपुरा गेट येथून निघणार असून कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येईल. तेथे ही रॅली विसर्जित होईल.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी शासकीय विश्रामगृहात या संदर्भात सर्व पक्षीय बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.यात शुक्रवारी निघणाºया रॅलीच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, याप्रसंगी माजी आमदार अविनाश वारजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, आर.पी.आय.चे व्ही.डी. मेश्राम, शफिक अहमद, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरसेविका सुनिता लोढीया, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचीन कत्याल, बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जीवतोडे, महेश मेंढे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अॅड. मलक शाकीर, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, असंघटीत कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी अन्वर आलम मिर्झा, हिराचंद बोरकुटे, किशोर पोतनवार, डी.के. आरीकर, अंकुश वाघमारे, अय्युब कच्छी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, फारूख सिद्धीकी आदी उपस्थित होते.
आज सर्वपक्षीय लोकतंत्र बचाव, संविधान बचाव रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:16 AM
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.
ठळक मुद्देसहभागी व्हावे : जटपुरा गेटमधून निघणार रॅली