लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता येथील चांदा क्लब ग्राऊंडवर होणाºया नागपूर विभागीय जनआक्रोश मेळाव्यासाठी चंद्रपूर महानगर सज्ज झाले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्याविरोधात आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी नागपूर विभागातील हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व जनता चंद्रपुरात दाखल होणार आहेत. या निमित्ताने काँग्रेसच्या केंद्र व राज्यातील नेत्यांची चंद्रपुरात मांदियाळी असणार आहे.या जनआक्रोश मेळाव्यासाठी मागील काही दिवसांपासून आ. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते रात्रंदिवस झटत होते. चांदा क्लब गाऊंडवर मोठा पेंडाल उभारण्यात आला आहे. साडेपाच फुटांचे सभामंडपही उभारले आहे. मेळाव्यात ५० हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता असल्याने कुणाचीही गैरसोय होऊ नये, म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी जातीने लक्ष ठेवून आहेत. तशा सूचनाही प्रत्येक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. चांदा क्लब गाऊंडवर ५० हजार नागरिक बसतील, अशी व्यवस्था केली आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक चव्हाण राहणार आहेत. तत्पूर्वी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही मागील काही दिवसांपासून स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्नर सभा पार पडल्या आहेत. गावागावातून नागरिक स्वयंस्फूर्तीने या मेळाव्यात आक्रोश व्यक्त करायला येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर स्वागत द्वार उभारण्यात आले आहे. मेळावास्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील गावागावांमधून जे कार्यकर्ते व जनता मेळाव्यासाठी खासगी वाहनांनी येणार आहेत, त्यांच्या वाहनांसाठी पार्र्कींगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, जि.प. गटनेता डॉ. सतीश वारजुकर, चंद्रपूर विधानसभा प्रमुख महेश मेंढे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, असंघटीत कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, अमजद अली, नगरसेवक शालिनी भगत, सुनिता अग्रवाल यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.जनतेचा आक्रोश सरकारला दिसणार - आ. वडेट्टीवारमहाराष्टÑ प्रदेश काँग्रेसच्या वतीने या विभागीय जनआक्रोश मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर जनता सहभागी होणार आहे. मागील तीन वर्षात राज्य शासन आणि केंद्र शासनाने जनतेची दिशाभूल केली. नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी केली. महागाईचा कळस गाठला आहे. या परिस्थितीत जनतेला जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. या सरकारला जनता विटली आहे. त्यांच्या मनात कमालीचा आक्रोश आहे. तो आक्रोश सोमवारी जनआक्रोश मेळाव्याच्या माध्यमातून या सरकारला दिसणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोलिसांचा तगडा बंदोबस्तदोन वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचे मेळावे होत असल्याने सोमवारी शहरात कार्यकर्ते व नागरिकांची अलोट गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी शहरात तगदा बंदोबस्त ठेवला आहे. दोन्ही कार्यक्रमस्थळी सोमवारी सकाळपासूनच दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात असणार आहे. याशिवाय शहरातील चौकाचौकातही पोलीस तैनात असतील. प्रत्येक बारिकसारिक गोष्टींवर पोलिसांची करडी नजर असेल, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली.विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा विभागीय शेतकरी मेळावाप्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी दुपारी २ वाजता दाताळा मार्गावरील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या पटांगणात नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात हजारो नागरिक केंद्र व राज्य शासनाविरोधात आपला संताप व्यक्त करणार आहेत, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. मेळाव्याबाबत माहिती देताना पुगलिया म्हणाले, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या कामगार मेळाव्यासाठी न्यू इंग्लिश हॉयस्कूलचे पटांगण पोलीस प्रशासनाने नाकारल्यानंतर सदर मेळावा इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. ऐनवेळी स्थळ बदलल्याने बॅनर, पॉम्प्लेट नव्याने तयार करावे लागले. तरीही मेळाव्याची तयारी आता पूर्ण झाली असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यकर्ते सज्ज असल्याचेही पुगलिया यांनी सांगितले. मेळावा सुरू होण्यापूर्वी नागपूर मार्गावरील विद्या निकेतन हॉयस्कूलपासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. प्रियदर्शिनी चौक-जटपुरा गेट-गांधी चौक-जटपुरा गेट ते इंदिरा गांधी गार्डन स्कूल असा रॅलीचा मार्ग असेल, असेही पुगलिया म्हणाले. पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे राहुल पुगलिया, गजानन गावंडे, अॅड. अविनाश ठावरी आदी उपस्थित होते.
काँग्रेसजणांचा आज जनआक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 11:59 PM
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता येथील चांदा क्लब ग्राऊंडवर होणाºया नागपूर विभागीय जनआक्रोश मेळाव्यासाठी चंद्रपूर महानगर सज्ज झाले आहेत.
ठळक मुद्देचंद्रपूर महानगर सज्ज : दोन्ही मेळाव्यांसाठी विदर्भातून कार्यकर्ते येणार