शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

आसोला मेंढा तलावावर पर्यटकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 12:46 AM

ब्रिटीशकालीन आसोला मेंढा तलावाच्या पूर्णत्वाने शतकपूर्तीचा उंबरठा गाठला आहे. येत्या २०१७ मध्ये या तलावाचा शतकपूर्ती महोत्सव साजरा होण्याची शक्यता आहे.

देशी-विदेशी पक्षाचे येथे स्थलांतर :  वनौषधी, वनसंपत्तीने समृद्ध परिसर उदय गडकरी  सावली ब्रिटीशकालीन आसोला मेंढा तलावाच्या पूर्णत्वाने शतकपूर्तीचा उंबरठा गाठला आहे. येत्या २०१७ मध्ये या तलावाचा शतकपूर्ती महोत्सव साजरा होण्याची शक्यता आहे. १०० वर्षाचा हा तलाव निसर्ग पर्यटकांसाठी मांदियाळीच ठरणारा आहे. कोणत्याच प्रकारची शासकीय मदत व सुविधा नसताना सुद्धा निसर्ग पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे त्याचेच ध्योतक आहे. ब्रिटिशांनी केवळ सिंचनाची सोय म्हणून आसोला मेंढा तलावाची निर्मिती केली. मात्र कालपरत्वे मााणसाच्या आवडी-निवडी बदलायला लागल्या आणि दैनंदिन धकाधकीच्या गराड्यातून मन:शांती लाभावी, आराम मिळावा, समाधान लाभावे, जीवनाचा आनंद घ्यावा, याकरिता लोकांनी एक दिवस का होईना, निसर्गाच्या सानिध्यात घालवावा अशी परिस्थिती निर्माण झाली. वनवैभवाने नटलेला निसर्गरम्य परिसर सर्वांच्याच आवडीचा विषय ठरला. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. जागतिक दर्जाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प, घोडाझरी तलाव या शिवाय जिल्ह्यातील अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. काही तलावांना शासनाने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. परंतु, आसोलामेंढा सारख्या तलावाची शासन दरबारी कायम उपेक्षाच राहिली आहे. प्रत्येक पर्यटन स्थळाचे वेगवेगळे महत्त्व असल्याने निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने आसोला मेंढा तलाव अत्यंत उपयुक्त ठिकाण ठरला आहे. तलाव पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरुन खळखळ वाहणारे पाण्याचे दृष्य मनाला मोहून टाकणारे असते. धबधब्यासारखे वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात अल्हाददाय वातावरणाची निर्मिती होत असते. वनवैभव, डोंगरकपारी आणि तलावाचे समुद्रासारखे दिसणारे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी निसर्ग पर्यटकांची पाऊले आपोआपच आसोला मेंढा तलावाच्या दिशेने चालायला लागली आहेत. सावली तालुका मुख्यालयापासून हा तलाव २० कि.मी. अंतरावर तर सिंदेवाही तालुका मुख्यालयापासून २४ कि.मी. अंतरावर आहे. दोन्ही मार्गाने या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येऊ शकते.