चंद्रपूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शहरामध्ये अाॅटोरिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत चंद्रपुरात ४ हजारच्या जवळपास ऑटोरिक्षा आहेत. त्यातही दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होत आहे. चंद्रपुरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यातही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन रस्ते पुन्हा अरुंद केले आहे. तर शहरातील गांधी चौक, जटपूरा गेट, गिरनार चौक, रामनगर चौकातील मार्गावर अनेक बेलगाम ऑटो थांबवतात. त्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. मात्र ऑटोचालकांवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ते बिनदिक्कतपणे रस्त्यावर ऑटो थांबवत आहेत. याकडे वाहतूक विभागांचे दुर्लक्ष होत आहे.
ऑटोरिक्षांमुळे वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:52 AM