लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : विजासन मार्गे चारगाव येथे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामामुळे तब्बल ११ तास बंद होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. येथील नागरिकांसह विद्यार्थी कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.रेल्वे प्रशासनद्वारे शुक्रवार सकाळपासून ते शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत या रेल्वे फाटकाजवळील दुरुस्तीचे काम सुरु असल्याबाबतची सूचना फलकांवर केली होती. मात्र हे सूचना फलक अगदी छोटे होते व ते एका कोपºयात ठेवले असल्याने याकडे येथील जाणाºया-येणाऱ्यांचे लक्ष गेले नाही. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून रेल्वे फाटक बंद झाल्याने या मार्गाने जाणारे वेकोलिचे कामगार, एकता नगरवासी, चारगाव, ढोरवासा ेयेथील नागरिक या रेल्वे फाटकावर अडकले. हे फाटक सकाळी आठ वाजेपर्यंत उघडणार नसल्याने येथील जाणाºया- येणाºयामध्ये एकच ताराबळ उडाली. या मार्गाला जोडणारा दुसरा मार्गही जवळपास नव्हता. त्यामुळे काही कामगार कामावरच गेले नाही. तर जाणाºया, येणाºयांनी या परिसरात आसरा घेतला. शनिवारी पहाटेपासून स्कूलबस, दूधवाले व इतर व्यावसाईक तसेच पहाटे जाणारे वेकोलि कामगार यांचीपुन्हा या ठिकाणी एकच रिघ लागली. परंतु फाटक आठ वाजेपर्यंत उघडले नाही. त्यामुळे अनेकांना त्रास झाला.
रेल्वेफाटक बंद असल्यामुळे ११ तास वाहतूक खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:11 AM