बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. बल्लारपूर व चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या विसापूर गावात पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा थांबा आहे. यामुळे येथे रेल्वे प्रशासनाने हाल्ट थांबा दिला आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. सर्वत्र टाळेबंदी लागू झाली. तेव्हापासून रेल्वेच्या अवगमनावर देखील प्रभाव पडला. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहे.
विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५.३० वाजताची बल्लारशाह ते देवळाली, सकाळी १०.३० वाजताची देवळाली ते बल्लारशाह, पहाटे ४.१० वाजताची काजीपेठ ते नागपूर, रात्री १.३० वाजताची नागपूर ते काजीपेठ, दुपारी १२.४५ वाजताची गोंदिया ते बल्लारशाह, दुपारी २.२० वाजताची बल्लारशाह ते गोंदिया, दुपारी ३.४५ वाजताची गोंदिया ते बल्लारशाह, सायंकाळी ४.४५ वाजताची बल्लारशाह ते गोंदिया, रात्री १०.३० वाजताची गोंदिया ते बल्लारशाह व सकाळी ५.४५ वाजताची बल्लारशाह ते गोंदिया या पॅसेंजर रेल्वे थांबतात. मात्र मागील दीड वर्षांपासून या सर्वच पॅसेंजर गाड्या कोरोनामुळे बंद आहेत. परिणामी विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकाला अवकळा आली आहे.
070921\img_20210907_100124.jpg
विसापूर गोंडवाना रेल्वे हॉल्ट स्टेशनवर दीड वर्षांपासून एकही गाडीचा थांबा नाही