लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली असून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेने केल्या जातात.शिक्षकांसाठी विविध गट निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज सादर केल्यानंतर त्यांना बदली दिली जाते. तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्याही बदल्या आॅनलाईन पद्धतीने केल्या जातात. बदल्यांची शक्यता लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या तयार केल्या आहे. प्रत्येक विभागाने बदलीपात्राची यादी तयार करून वरिष्ठांकडे सादर केली आहे. शिक्षण विभागानेही बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या या पूर्वीच पंचायत समितीकडून मागविल्या. त्यानुसार याद्या तयार करण्यात आल्या आहे.आरोग्य विभागानेही बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार ठेवली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारितील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त, बांधकाम, सिंचन, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण आदी विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या तयार करून ठेवल्या आहेत. मात्र अद्यापही शासनाकडून बदल्यासंबंधी कोणतेही निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नसल्याने जिल्हा परिषद आदेशाची प्रतीक्षा करीत आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते. आता आचारसंहिता संपल्यामुळे लवकरच बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे कर्मचारी तसेच शिक्षकांमध्ये बदल्यांसदर्भात चर्चा सुरू झाली आहे.कर्मचाऱ्यांत धास्तीसध्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मोसम असून सर्वत्र बदलीच्याच चर्चा आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला त्यांची बदली होणार आहे. असे असले तरी अतिदुर्गम भागात जाण्यास कर्मचारी तयार नसून स्वगृहीच राहण्याची त्यांची इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत बदली गावाजवळच व्हावी अशी इच्छा या कर्मचाऱ्यांची असून जिवतीसारख्या दुर्गम भागात जाण्यास कर्मचारी इच्छुक नाही.
शिक्षक, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:48 AM
लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली असून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे.
ठळक मुद्देचर्चांना उधान : शासनाच्या आदेशाकडे जिल्हा परिषद प्रशासनाची नजर