शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहून गेल्याने पाटागुड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.४० ते ५० वर्षांपासून वास्तवात असलेल्या पाटागुड्यात गोंड व कोलाम समाजाची दीडशे घरांची वस्ती आहे. संपूर्ण दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाच्या कुठल्याच सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. गुड्यात एक सिंमेट रस्ता आणि हातपंप वगळला तर शासनाच्या कुठल्याच योजनेतील विकासगंगा अवतरली नसल्याचे चित्र आज बघायला मिळते. आजही येथील नागरिकांना वीज, पाणी, आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न भेडसावतो आहे. गावात शाळाही नाही.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षरस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी अनेकवेळा संबंधित लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकवेळा रस्त्याचे काम करून मिळावे म्हणून ठरावही घेतले. मात्र कुठल्याच नेत्याला किंवा अधिकाºयाला पाझर फुटला नाही. निवडणुका आल्या की मतदारांना आश्वासने द्यायची आणि निवडणुका संपल्या की तीच आश्वासने विसरून जायची. ही परंपरा असल्याने पाटागुड्यातील आदिवासी बांधवाचा विकास खुंटला जात आहे.आरोग्य सुविधा शून्यजायला रस्ता नाही. गावात आरोग्याच्या सोईसुविधा नाही आणि पावसाळ्यात एखाद्याचे आरोग्य बिघडले तर दिवसा कसेही रूग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पोहचवता येईल. पण रात्री रूग्णांना उपचारासाठी नेणे कठीण आहे. कधी बैलबंडीने तर कधी पायी चालत रूग्णांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जावे लागते. पावसाळ्याचे चार महिने तर नागरिकावर संकटच असते.
गुडघाभर पाण्यातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:29 PM
एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहून गेल्याने पाटागुड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.
ठळक मुद्देपाटागुड्यातील प्रकार : विद्यार्थ्यांचीही जीवघेणी कसरत