----
भाजी बाजारात
कुत्र्यांचा हैदोस
चंद्रपूर : गंजवाॅर्ड तसेच गोल बाजारामधील भाजी बाजारात मोकाट कुत्रे फिरत आहेत. तसेच शहरातील इतर भागातही मोठ्या प्रमाणात संख्येने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महानगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर-कोरपना मार्गाची दुरवस्था
चंद्रपूर : चंद्रपूर-कोरपना तालुक्याला जोडणारा कोरपना-अंतरगाव-चंद्रपूर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पादचाऱ्यांचा जीव टांगणीला
चंद्रपूर : अलीकडे युवा अवस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणे क्रेझ निर्माण झाली आहे. रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात चालला असल्याने पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहनधारक व पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाताना जपूनच चालावे लागते आहे.
वणी- मार्गावर
बसफेऱ्या वाढवा
कोरपना : कोरपना येथून वणी येथे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र या मार्गावर अत्यल्प फेऱ्या असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे या मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.