लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जन्माला येणारी दिव्यांग बालके गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखे वाटतात. काही पालक आपल्या परिस्थितीअभावी अशा बालकांची उत्तरायुष्यात काळजी व योग्य उपचार करू शकत नाही. मात्र, अशी बालके जन्मताच योग्य उपचार पद्धतीने दुरूस्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात डिस्ट्रिक्ट इंटरव्हेन्शन सेंटरची सुरुवात करताना मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. डिस्ट्रिक इंटरव्हेन्शन सेंटर इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी गुरूवारी ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र्र पापळकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते. नवजात अर्भकाला जन्मताच योग्य उपचार मिळावा यासाठी आवश्यक असणाऱ्या डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेशन सेंटर (डीईआयसी) अर्थात नवीन शीघ्र हस्तक्षेप केंद्राची निर्मिती करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी मोलाची भूमिका बजावली. याकरिता अडीच कोटी खर्च करून हे केंद्र जिल्हा सामान्य रूग्णालयात उभाण्यात आले आहे.केंद्रामुळे मुलांमध्ये असणाऱ्या जन्मजात कमतरतेला दूर करण्यास मदत होणार आहे. जन्मजात दिव्यांग बालकांसाठी अत्याधुनिक उपचार करण्याची सुविधा या केंद्रात राहणार आहे, अशी माहिती ना. अहीर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यामध्ये उत्तम आरोग्य सुविधा देण्याकडे सातत्याने लक्ष दिल्या जात आहे. डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेशन सेंटर (डीईआयसी) द्वारे आधुनिक सुविधा मिळाव्या, याकरिता निधी कमी पडू देणार नाही, असेही ना. अहीर म्हणाले. एकाच सुसज्ज इमारतीमध्ये पूर्ण वैद्यकीय यंत्रणा व प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे केंद्र दिव्यांग बालकांना सेवा देणार आहे.यावेळी आमदार शामकुळे, महापौर घोटेकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन सोनाली गायकी यांनी केले. आभार अश्विनी जुलमे यांनी मानले. आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डीईआयसीतून दिव्यांग बालकांवर उपचार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:31 AM
जन्माला येणारी दिव्यांग बालके गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखे वाटतात. काही पालक आपल्या परिस्थितीअभावी अशा बालकांची उत्तरायुष्यात काळजी व योग्य उपचार करू शकत नाही.
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा सामान्य रुग्णालयात डीईआयसी इमारतीचे भूमिपूजन