शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

आरोग्य केंद्रातील खाटांअभावी रूग्णांंवर खालीच होतो उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:00 AM

राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आहे. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु काही उपयोग झाला नाही, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांमध्ये संताप । देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवाडा : आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णांना खाटांअभावी जमिनीवरच उपचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर रूग्णांचे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडविण्याची मागणी रूग्णांचे कुटुंबीय व नागरिकांनी केली आहे.राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आहे. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु काही उपयोग झाला नाही, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रूग्णालय परिसराची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे रूग्णांना प्रचंड त्रास होतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना नाईलाजाने जमिनीवर झोपावे लागत आहे. आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रूग्णांना सौजन्याची वागणूक देत नाही, असा आरोप रूग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी केला आहे.आरोग्य केंद्रात साप घुसल्याने तारांबळदेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला. झाडेझुडपे वाढल्याने परिसरात सापांचा संचार सुरू झाला आहे. मंगळवारी रात्री आरोग्य केंद्रातील रूग्णांच्या एका खोलीत अचानक साप आल्याने महिला रूग्णांची तारांबळ उडाली. मात्र रूग्णांना जीव वाचविण्यासाठी खाटावरून उठावे लागले. दरम्यान, काहींनी हिंमत करून सापाला उसकावून लावल्यो पुढील अनर्थ टळल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांनी समस्यांबाबत माहिती दिली. रूग्णांना कोणत्याही अडचणी येऊ नये, याबाबत सूचना दिल्या. लगेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही आरोग्य केंद्रात बोलावले.- मुमताज जावेद अब्दुल, सभापती पंचायत समिती, राजुराआरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी २० दिवसांपासून रजेवर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रा वर्ग चार श्रेणीच्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई करू.- प्रकाश नगराळे, तालुका आरोग्य अधिकारी, राजुरा

टॅग्स :Healthआरोग्य