भद्रावती :
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णालय तथा डॉक्टर्स यांचा तूटवडा, यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात जाऊन उपचार घेणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे हेल्पलाइन नंबर जाहीर करून रुग्णांनी दिलेल्या माहितीच्या आधारे औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन ऑनलाइन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी ज्या पद्धतीने आपले स्वतःचे मंगल कार्यालय प्रशासनाला देऊन, तिथे कोविड सेंटर सुरू केले व रुग्णांसाठी नास्ता, जेवणाची, शुद्ध पाण्याची व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन तथा सॅनिटायझरची मोफत व्यवस्था असलेले सुसज्ज असे कोविड सेंटर भद्रावती शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी उपयोगी ठरत असतानाच, आता शिंदे परिवाराने यापुढचे पाऊल म्हणून कोरोना पॅाझिटिव्ह रुग्ण ज्यांना घरीच विलगीकरणाची नियमाने परवानगी दिली गेली आहे, अशा रुग्णांना व इतर आजार असलेल्या रुग्णांना त्यांच्या रिपोर्टवरून हेल्पलाइन व्हॉट्सॲप क्रमांकावर रुग्णांच्या रिपोर्ट संदर्भात भरलेला अर्ज पाठविल्यानंतर, रुग्णांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर योग्य औषधोपचार व मार्गदर्शन सेवा देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
वरोरा भद्रावती तालुक्यात ज्या पद्धतीने कोरोना संक्रमण गावागावात पोहोचल्याने, एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच उपचार व मार्गदर्शन मिळावे, म्हणून डॉ.विवेक शिंदे यांनी हेल्पलाइन नंबर ९७६७७४४९३८, ९४२०१३९१३३ वर व्हॉट्सॲपद्वारे माहिती फॉर्म भरून पाठवावी. अधिक माहितीसाठी ८७८८३१२९५ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जर हे मोबाइल नंबर व्यस्त असेल, तर रवींद्र शिंदे यांच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहनही करण्यात आले आहे.