जिवती : गडचांदूर- जिवती मुख्य मार्गावर माणिकगड किल्ल्याच्या पहाडावर ऐन रस्त्यावरच झाड कोसळल्याने पूर्णतः वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी संततधार वादळी वाऱ्यासह पावसाने झाडाची मुळे उन्मळून झाड हे गडचांदूर जिवतीमार्गे जंगल आणि पहाड सुरुवात होते त्या मुख्य मार्गावरच कोसळून पडले आहे. जिवतीवरून गडचांदूर व गडचांदूर वरून जिवती ये-जा करणे हे पूर्णपणे ठप्प झाले आहे.
जिवती हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालय, पंचायत समितीत काम करणारे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर वा गडचांदूरवरून ये-जा करत असतात. जिवतीवरून रुग्णाला जर गडचांदूर, चंद्रपूर येथे रेफर केले, तर रुग्णवाहिकासुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिवतीकडे येणाऱ्या सगळ्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. कोणतेही चारचाकी वाहन जाऊ शकत नसल्याने नागरिकांना प्रवासासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडून असलेल झाड अद्यापही बाजूला न केल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. संबंधित विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे.
140921\img-20210913-wa0002.jpg
झाड रस्त्यावरच कोसळल्याणे ये जा थांबली