लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै २०१९ पासून राज्यात ३३ कोेटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली. त्या दृष्टीने राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे. वृक्षरोपणासाठी जनजागृती करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथून निघालेली वृक्षदिंडी सोमवारी चंद्रपुरात दाखल झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, समुद्रपूर, जाम, हिंगणघाट, वरोरा, भद्रावती, ताडाळी मार्गाने चंद्रपुरात आलेल्या दिंडीने नागरिकांना वृक्षारोपणाचा संदेश दिला. नागपूरचे आमदार अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ आॅग्रनायझेशनच्या माध्यमातून तसेच आमदार डॉ. रामदास आंबटकर, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास यांच्या सहकार्याने नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात वृक्षदिंडीद्वारे जागृती करीत आहेत.नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वृक्षलावगड कशी काळाची गरज आहे, हे वृक्षदिंडीतून पटवून देण्याचे काम केल्या जात आहे. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन ३३ कोटी वृक्ष लागवडीची चळवळ जनसामान्यामध्ये रूजवून निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम नागरिकांनी करावे, हे पथनाट्यातूनही सांगितल्या जात आहे. वरोरा येथे दुपारी ३ वाजता दिंडीचे आगमन झाले. यावेळी विभागीय वन अधिकारी सोनकुसरे यांच्या उपस्थितीत दिंडीचे स्वागत करण्यात आले.चंद्रपुरात नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. महानगरपालिकेसमोर कलावंतानी पथनाट्य सादर केले. दिंडीचा आज चंद्रपुरात मुक्काम असून उद्या सकाळी ९ वाजता मूल मार्गाने गडचिरोलीकडे रवाना होणार आहे. दरम्यान, वृक्ष लागवडीचा संदेश देणार आहे.
वृक्षदिंडी चंद्रपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:07 PM
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै २०१९ पासून राज्यात ३३ कोेटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली. त्या दृष्टीने राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे. वृक्षरोपणासाठी जनजागृती करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथून निघालेली वृक्षदिंडी सोमवारी चंद्रपुरात दाखल झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देवृक्षारोपणासाठी जागृती : आज दिंडी गडचिरोलीकडे