चंद्रपूर : आदिवासी विकास विभागाच्या योजना मंजूर होऊनही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली असून ही समिती १६ ते २० जून दरम्यान प्रकल्प कार्यालय चंद्रपूरला भेट देणार आहेत. सुनील भोसले व जे.सी.शिरसाळे हे या समितीचे सदस्य आहेत. ते चंद्रपूर प्रकल्प कार्यालयास भेट देऊन सन २००४-०५ ते २००८-०९ या कालावधीत आदिवासी विकास योजना ज्या ज्या ठिकाणी राबविल्या आहेत, त्याबाबत चौकशी व पाहणी करणार आहेत. सन २००४-०५ ते २००८-०९ या कालावधीत आदिवासी विकास विभागातर्फे ज्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्यासंबंधी ज्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत नावे असूनही त्यांना लाभ न मिळाल्याबद्दल तक्रारी आहेत. अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात १६ ते २० जून पर्यंत दुपारी ३ ते ५ या वेळेत चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांसमोर चंद्रपूर प्रकल्प कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन चौकशी समितीतर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आदिवासी विभागाच्या योजनांची होणार चौकशी
By admin | Published: June 15, 2016 1:12 AM