शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 10:27 PM

इयत्ता १ ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मागील चार वर्षांपासून थकीत आहे. शिष्यवृत्तीच न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. दिवाळीच्या दिवसातही ही रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा भागवाव्या, या प्रश्नांमुळे पालक प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती प्रलंबित : पालकांमध्ये तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इयत्ता १ ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मागील चार वर्षांपासून थकीत आहे. शिष्यवृत्तीच न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. दिवाळीच्या दिवसातही ही रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा भागवाव्या, या प्रश्नांमुळे पालक प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, याकरिता शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सुरू केली. १ ते ४ वर्गासाठी १ हजार, ५ ते ७ वर्गासाठी दीड हजार आणि ८ ते १० वर्गासाठी दोन हजार रूपये दरमहा शिष्यवृत्ती दिल्या जाते. या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मिळते. जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले आदिवासी विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत.सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्य शासनाने जुन्या निकषात बदल करून आॅनलाईन अर्ज करण्याचे धोरण स्वीकारले.याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे. केवळ माहितीअभावीही काही विद्यार्थी आॅनलाईन अर्ज भरू शकले नाहीत. मात्र जिल्ह्यातून चार ते चार हजार ५०० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर करून सर्व प्रक्रिया पुर्ण केली. प्रशासनाकडून पुढील कारवाई करणे गरजेचे होते.मात्र संबंधित अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने राज्य शासनाकडून प्राप्त होणाºया निधीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. परिणामी विद्यार्थ्यांचा काहीही दोष नसताना शिष्यवृत्तीपासून त्यांच्यावर वंचित राहण्याची वेळ आली आहे.कार्यवाहीत घोडचुकाविद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळांच्या मुख्याध्यापकांनी संबंधित कागदपत्रांची पुर्तता पंचायत समितीकडे केली. पुढील प्रक्रिया करण्याची जबाबदारी वरिष्ठांची होती. परंतु, अत्यावश्यक प्रशासकीय कारवाई करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून काही घोडचुका झाल्या. त्यामुळे शिष्यवृत्तीचे पात्र लाभार्थी नेमके किती याची माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केली नाही.