शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

डोणी फाट्यावर तिहेरी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:48 PM

मूल-चंद्रपूर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डोणी फाट्यावर घडली.

ठळक मुद्देविचित्र घटना : १ ठार, ६ जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल-चंद्रपूर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डोणी फाट्यावर घडली. अपघातात दिवाकर विठोबा निमगडे (६२) रा. मूल यांचा जागीच मृत्यू झाला.अंबादास पांडुजी रामटेके, रा. मूल, राजेंद्र दिवाकर कन्नमवार, दिवाकर कन्नमवार, लिलाबाई कन्नमवार रा. ताडाळा, मंगेश आनंदराव पुण्यपरेड्डीवार रा. लखमापूर बोरी, योगेश रमेश मोहुर्ले रा. चिमढा हे गंभीर जखमी आहेत. बुधवारी रात्री ७.३० वाजता सुमारास मूल-चंद्रपूर मार्गावरील डोणी फाट्याजवळ एमएच ३४ ए १४८८ हा ट्रक नादुरस्त असल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी ट्रक चालकाने ट्रकचे इंडिकेटरही सुरू केलेले नव्हते. तसेच तो त्या ट्रक जवळ उभाही नव्हता.मूल येथील अंबादास रामटेके हे जावई दिवाकर निमगडे यांच्यासोबत दुचाकीने सुशी येथून मुलकडे येत होते. दरम्यान मूलकडून चंद्रपूरकडे जाणाºया एका चारचाकी वाहनाच्या लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे दुचाकी वाहन चालकाचे डोळे दीपले. यातच रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला जबर धडक बसली. यात दिवाकर निमगडे हे जागीच ठार झाले.अपघातामुळे दुचाकी रस्त्याच्या मध्ये पडली. त्यानंतर काही क्षणात ताडाळा येथील राजेंद्र कन्नमवार हे वडील दिवाकर कन्नमवार आणि आई लीलाबाई कन्नमवार यांना घेवून चारचाकी वाहनाने येत असताना दुचाकीवर धडकले. यात दोन्ही वाहनातील इसम गंभीर जखमी झाले.या दरम्यान आणखी एक चारचाकी वाहन वाहन मूलवरून चंद्रपूरकडे जात असताना अपघातस्थळाजवळ पूर्वीच्या अपघातग्रस्त चारचाकी वाहनाला धडक बसली. त्यामुळे त्या वाहनातील इसमही जखमी झाले. यामुळे या मार्गावरील संपुर्ण वाहतूक खोळंबली असतानाच एमएच ३४ एम ७९३० या क्रमांकाच्या ट्रक चालकाने सुद्धा अपघातग्रस्त चारचाकी वाहनाला धडक दिली.या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून रहदारी सुरळीत केली. जखमींना उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून उपचार सुरू आहे.