आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच थकीत करामुळे अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जिल्ह्यातील जवळपास दोनशे पाणी पुरवठा योजनांकडे आठ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे. पाणीपुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्तीसाठी राज्य शासन दरवर्षी तीन ेकोटींचा निधी देते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा निधी राज्य शासनाने दिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यातच थकबाकीही वसूल होत नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे चंद्रपूर, चिमूर, राजुरा आणि सिंदेवाही असे उपविभाग आहेत. या सर्वच उपविभागाचे पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू असले तरी ग्रामपंचायतींचा प्रतिसाद मिळत नसल्याने या विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायतींना थकबाकीसाठी वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्षच होत आहे.वसूल रकमेतून विकास कामांवर खर्चजि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक नळयोजना चालविल्या जातात. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. तर पाणीपट्टीची थकबाकी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. एकूण रकमेपैकी ८० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्द करावी लागते. उर्वरित २० टक्के रकम गावातील विकासकामे करण्यावर अभिप्रेत आहे. मात्र, ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल केल्यानंतर ती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे न देता विकास कामावरच खर्च करीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
थकीत पाणीपट्टीमुळे अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:07 AM
यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायतींचे दुर्लक्ष : ३५ प्रादेशिक नळयोजना