चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील सास्ती-गोवरी- पोवनी या कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळसा वाहतुकीसाठी वाहतूकदारांमध्ये स्पर्धेतून वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान कामबंद पाडण्यापर्यंत होऊन वाहतूकदार एकमेकांविरुद्ध पोलिसात गेले. परंतु या वादावर आता तोडगा निघाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेकोलिच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटांची बैठक घेण्याची सूचना हितेंद्र अहीर यांनी केली होती. त्यानुसार महाप्रबंधक वर्गीस यांनी कार्यालयात बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून हितेंद्र अहीर, उपाध्यक्ष रिंकू शेरगिल, सचिव कृष्ण कुंबाला, कोषाध्यक्ष विनायक देशमुख यांची निवड करण्यात आली. बैठकीला आमदार अॅड. संजय धोटे, ठाणेदार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक ठाकूर, सतीश धोटे, विग्नोज राजुरकर, मुख्य सुरक्षा अधिकारी शेट्टी, जय माँ दुर्गा ट्रान्सपोर्ट असो.चे रिंकू शेरगिल, राजू यादव, महादेव तपासे, बबलु चिंतनाला, जोगिंदर राणा, शमशुलभाई, मनोज खनके, विनोद शेरकी, अनिल झा, पाठक, श्रीनिवास कापुला यांच्या सह अनेक ट्रान्सपोर्ट व्यवसायीक उपस्थित होते.यावेळी विविध विषयांवर समाधानकारक चर्चा झाली. (स्थानिक प्रतिनिधी)
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या वादावर अखेर तोडगा
By admin | Published: July 18, 2015 12:56 AM