लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. यानुसार २१ डिसेंबरला निवडणूक होईल. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रकिया सुरू असल्याचे लक्षात येताच अनेक राजकीय पक्षांकडून संबंधित नगरपंचायतस्तरावर हालचालींना वेग आला होता. आता निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा झाल्याने स्थानिक पुढारी आणि इच्छुकही कामाला लागले आहेत. या शहरांचे नागरिकही निवडणुकीच्या चर्चेत रंगले आहेत.सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती या नगरपंचायतींच्या निवडणुकांना पाच वर्षे पूर्ण झाले होते. मात्र कोरोनामुळे निर्धारित वेळेत या नगरपंचायतीच्या निवडणुका होतील याबाबत साशंकतेचे वातावरण होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात होती. मात्र सध्या तरी तिसरी लाट दिसत नाही. अशातच नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २१ डिसेंबरला मतदान होईल. या अनुषंगाने निवडणुकीसाठी इच्छुक मंडळी आधीपासून तयारीला लागले होते. अशातच मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले. यामध्ये हक्काचा प्रभाग गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. राजकीय पक्षही उमेदवारांच्या शोधात धडपडत असल्याचे चित्र आहे. या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे एकूणच घडामोडींवरून दिसून येत आहे.
ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूकपोटनिवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतींमध्ये १७ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर करण्याचा कालावधी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील.नामनिर्देशनपत्र छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता होईल. ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात येईल. निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होईल. आवश्यक असल्यास २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होईल आणि २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल.
मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षणात स्वीकारणार दावे व हरकतीचंद्रपूर : १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. दावे व हरकती स्वीकारण्याबाबत विशेष मोहीम २७ व २८ नोव्हेंबरला राबविण्यात येणार आहे दि.१ नोव्हेंबर रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. दि. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याची विशेष मोहीम दि. १३ व १४ नोव्हेंबरला घेण्यात आली. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक दि. २७ व २८ नोव्हेंबरला दावे व हरकती स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दावे व हरकती दि. २० डिसेंबरपर्यंत निकालात काढण्यात येतील. दि. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नावनोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम- अंतिम प्रभागनिहाय यादी प्रसिद्ध २९ नोव्हेंबर २०२१- नामनिर्देशन संकेतस्थळावर उपलब्ध १ ते ७ डिसेंबर- नामनिर्देशन स्वीकारणे १ ते ७ डिसेंबर- नामनिर्देशन पत्रांची छाननी ८ डिसेंबर- नामनिर्देशन पत्र मागे घेणे १३ डिसेंबर- अपील सादर करणे १६ डिसेंबर- निवडणूक चिन्ह वाटप- उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटीच्या दिवशी आवश्यक असल्यास मतदान २१ डिसेंबर- मतमोजणी २२ डिसेंंबर