शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार

By admin | Published: March 05, 2017 12:43 AM

महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून, उत्पादन वाढ, योग्य बाजारपेठ निवड, उत्पादनाचे योग्य पॅकींग, ....

ए एस आर नायक याचे प्रतिपादन : महिला बचत गटांना मिळणार लाभचंद्रपूर : महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून, उत्पादन वाढ, योग्य बाजारपेठ निवड, उत्पादनाचे योग्य पॅकींग, ब्रँडीग, व विविध स्तरावर विक्रीचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याद्वारे महिला बचत गटांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी केले.स्थानिक चांदा क्लब ग्रांऊडवर आयोजित सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ ला नुकतीच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए एस आर नायक व नागपुर येथिल विदर्भ ईडंस्ट्रिज असोसिएशनच्या प्रतिनिधींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.नागपुर येथिल विदर्भ इडंस्ट्रिज असोसिएशनच्या प्रतिनिधी चमूकडृून सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ महिला बचत गटांच्या २५० स्टॉलला भेट देवून, महिलांशी चर्चा करुन व्यवसायाविषयीचे मत जाणून घेतले. याशिवाय व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल याविषयीची माहिती जाणून घेतली. तसेच विदर्भ इडंस्ट्रिज असोसियशनचे जाईन्ड सेक्रेटरी गिरधारी मंत्री यांनी बचत गटातील महिलांना उत्पादनाचे मार्केटिंग कसे केले पाहिजे, उत्पादन क्षमता कशाप्रकारे वाढविली पाहिजे, याविषयी आपल्या सादरीकरणाद्वारे उपस्थित बचत गटांच्या महिलांना समजावून सांगितले. उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकत्ता कशी सुधारता येईल. यासाठी महिला बचत गटांना काही प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी अशाप्रकारचे सर्व प्रशिक्षण विदर्भ इडंस्ट्रिज असोसियशन कडुन नागपुर येथे देण्याची यावेळी हमी दिली. याशिवाय महिला बचत गटामधून काही निवडक महिलांची निवड करुन, त्यांना मार्के टिंगसाठी तयार करावे. गिरधारी मंत्री पुढे म्हणाले, महिला बचत गटातंर्गत तयार होणाऱ्या उत्पादनासाठी रेल्वेस्टशन, विमानतळ, बंदर, याठिकाणी महिला बचत गटांच्या महिलांना आपले उत्पादन विक्री करण्याकरिता व्यासपिठ मिळाल्यास बचत गटाचे तयार होणारे दर्जेदार उत्पादन विक्री करण्यास राज्य, देश पातळीपासुन जागतिक पातळीचे बाजार उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. यासाठी विदर्भ इडंस्ट्रिज असोसियशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या सहकायार्ने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे यावेळी विदर्भ ईडंस्ट्रिज असोसियशनचे जाईन्ड सेकर्टरी गिरधारी मंत्री यांनी सांगितले. भेटी दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, विदर्भ ईडंस्ट्रिज असोसियशनच्या अंजली गुप्ता, विचित्रा चोपडा, रिता लांजेवार, इंदू श्रिरसागर, पुनम लाला, प्रकाश ईटनकर अंजु सोमाणी, गडचिरोली ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जयंत बाबरे यावेळी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)