आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतीपंपाला लागणाºया वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या. एवढेच नाही, तर पाईपलाईन देखील टाकली आहे. परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी आता हतबल झाले आहेत. शासनाने वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यावर शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश शेतकºयांना सौरप्रणाली पाहिजे नसल्याने ते वीज कनेक्शनसाठी अडून आहे.३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत. अशा शेतकऱ्यांना आता नवीन वीज कनेक्शन देने बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली 'एचव्हीडीएस' अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफर्मारचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवून थेट रोहित्रावरून कृषिपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या जोडणीसाठी पाच ते सहा वषार्पासून पैसे भरले आहेत. त्यातील काहींची अद्यापही जोडणी बाकी असल्याने या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.महावितरणच्या या गलथान कारभारामुळे राज्यभरात अनेकदा निवेदने, आंदोलने करण्यात आली. मात्र कंपनीने विविध कारणे देत नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे. विशेष म्हणजे, शासनाचा आता सौरऊर्जेवर भर असून त्यादृष्टीने पाऊल उचलने सुरू केले आहे.शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणारशासनाने वीज जोडणी नाकारून शेतात सौरपंप लावण्याचा तगादा शेतकºयांकडे लावला आहे. शेतात वीज पोहचविणे बंद झाल्याने वीजेअभावी शेतातील शेतमाल प्रक्रिया यंत्र, अवजारे, मळणी यंत्र, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे यंत्र आदी सौर ऊर्जेवर चालणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढणार आहे.शासनाने सरसकट कृषी पंपाला वीज जोडणी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून तो चुकीचा आहे. यापूर्वी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी व सौरपंप असे दोन्ही गरजेचे असून मागणीनुसार सेवा उपलब्ध करून द्यावी.- प्रशांत कोल्हेशेतकरी, वहाणगा
शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 10:17 PM
शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देशेतकरी हैराण : महावितरणने दिला सौरपंपाचा पर्याय