बॉक्स
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी
शेतात काम करीत असताना पाऊस सुरू झाल्यास, शेताजवळील घराचा आसरा घ्यावा. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यापासून बाहेर यावे. झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.
पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनात थांबावे.
बॉक्स
कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई
वीज पडून मृत्यू झाल्यास शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात येते. त्यासाठी संपूर्ण पंचनामा करण्यात येते. त्यानंतर, मृतकांच्या वारसांना साधारणत: दोन ते चार लाख रुपयांची मदत करण्यात येते. जखमी व्यक्तींनाही त्यानुसार मदत देण्यात येते, तसेच जनावरे जखमी किंवा मृत झाल्यास त्यांच्या मालकांना मदत देण्यात येते.
बॉक्स
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?
वीज पडण्यास प्रतिबंधात्मक म्हणून वीज अटकाव यंत्रणेकडे बघितले जाते. जिल्ह्यात अशा वीज अटकाव यंत्रणा आहेत. वीज वितरण कंपनीतर्फे या यंत्रणा राबविण्यात येतात. त्यामुळे अशा घटनांना टाळण्यास मदत मिळते. ग्रामीण भागात अशा यंत्रणा तयार करण्याची मागणी होत आहे.