लसीकरण केंद्रावर तसेच आरटीपीसीआर तपासणी केंद्रावर टोकन घेण्याकरिता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गर्दी कमी करण्याकरता जे नागरिक शुल्क देऊन लस घेण्यास तयार आहेत. अशाना शुल्क देऊन स्वतंत्र रांग लावण्यात यावी, तसेच जे नागरिक निशुल्क लस घेणार आहेत, त्यासाठी स्वतंत्र रांग लावण्यात यावी, जेणेकरून लसीकरण तसेच तपासणी केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. यातून येणारा पैसा शासनाच्या नावे स्वतंत्र खाते उघडून जमा करावा, हा निधी कोरोना लढाईसाठी खर्च करण्यात यावा, तसेच जून महिन्यात बारावीची ऑफलाइन परीक्षा होणार असल्याने आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १८ वर्षाखालील बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी निवेदनातून केली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राथमिकता द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:29 AM