शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मोफत शाळा प्रवेशासाठी अडीच लाख विद्यार्थी रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:23 PM

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.

ठळक मुद्देराईट टू एज्युकेशन : एप्रिल महिन्यात निघणार सोडत

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१९-२०२० या सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.यावर्षी राज्यातील ३६ जिल्ह्यातील नऊ हजार १९४ शाळांमधील एक लाख १६ हजार ८२१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यात दोन लाख ३० हजार ६२३ अर्ज आले आहेत. यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ६००७, अमरावती ७८३१, भंडारा २३५३, बुलढाणा ४८६६, चंद्रपूर ३४८५, गडचिरोली ११०६, गोंदिया २५१४, नागपूर २५१६०, वर्धा ३८८५, वाशिम १४४८, यवतमाळ ४७४५ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.मोबाईल अ‍ॅपमार्फत ८४५ अर्जआरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. तसेच मोबाईल अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आले आहे. मात्र अ‍ॅपद्वारे केवळ ८४५ पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज केले आहे. त्यामध्ये हिंगोली एक, गोंदिया सहा, जलगाव १७, जालना ३६, कोल्हापूर ५४, लातूर १६, मुंबई १७, मुंबई १, नागपूर ४५, नांदेळ १७, अहमदनगर ३५, अकोला १२, अमरावती ६, औरंगाबाद ७९, भंडारा दोन, बीड ३५, बुलढाणा १९, चंद्रपूर तीन, धुळे ६, गडचिरोली दोन, नंदूरबार एक, नाशिक ४३, उस्मानाबाद १३, पालघर आठ, परभणी ८, पुणे २२४, राजगड १८, रत्नागीरा दोन, सांगली २६, सातारा आठ, सोलापूर १९, ठाणे ५२, वर्धा पाच, वाशिम चार, यवतमाळ पाच अ‍ॅपद्वारे अर्ज केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही.पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्जआरटीईतंर्गत मोफत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील ९६३ शाळेतील १६६२३ जागेसाठी ५१ हजार ३२० पालकांनी अर्ज केले आहेत. नागपूर सात हजार २०४ जागेसाठी २५१६०, ठाणे १५१५२, औरंगाबाद १३५५० तर सर्वात कमी नंदूरबार ४८०, रत्नागिरी ८८९, सिंधुदुर्ग ५९३ पालकांनी अर्ज केले आहेत.