शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

विसर्जनात दोन मंडळांमध्ये हाणामारी; पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 3:00 PM

दहा जण जखमी : डीजेच्या तालावर नाचताना झाला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क टेमुर्डा : दुर्गादेवी विसर्जनादरम्यान नृत्य करताना टेमुर्डा येथील दोन मंडळांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १४) उघडकीस आली. या घटनेत दहा जण जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी लाठीमार केल्याने तणाव निवळला. अमित डाहुले (२५), गोपाल तुमराम (२६), महेश गायकवाड (२४), सौरभ झिले (२५), देवीदास टेकाम (४०), आनंद कश्यप (४२) आदींसह अन्य सहा किरकोळ, अशी जखमींची नावे आहे.

टेमुर्डा येथे सोमवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजता पाच सार्वजनिक दुर्गादेवीची ढोलताशे व डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत युवक, युवती व महिला बेधुंद नाचत होत्या. अशातच हुडकी मंडळातील एक युवक नृत्य करताना खाली कोसळला. दरम्यान, दोन मंडळांतील युवकांमध्ये कडाक्याच्या भांडण झाले. कुणीच समझोत्याची भूमिका घ्यायला तयार नव्हते. वाद वाढत जाऊन हुडकी व टेमुर्डा या दोन मंडळांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी सुरू झाली. हा प्रकार पाहून काही व्यक्तींनी वरोरा पोलिसांना माहिती दिली. रात्री १ वाजता दंगा नियंत्रक पथक टेमुड्यात दाखल झाले. पोलिसांनी पुन्हा अतिरिक्त कुमक बोलावली. वरोराचे सहायक पोलिस निरीक्षक नासरे, बिट जमादार विकी करपे आदी दाखल झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. हाणामारीत अमित डाहुले, गोपाल तुमराम, महेश गायकवाड, सौरभ झिले, देवीदास टेकाम, आनंद कश्यप हे युवक जखमी झाले. सहा जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, रात्री उशिरा टेमुर्डा नवदुर्गा मंडळ आणि हुडकी बजरंग दलाच्या अध्यक्षांनी एकमेकांविरुद्ध वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर