चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील ऊर्जाग्राम व विजासन या दोन रेल्वे लाइनवर रेल्वेखाली येऊन दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
महेश विजय जुनघरे (४७, राहाणार कुटाळा), तर गजानन बबन गाताडे (४८, रा. विजासन, नेताजी वाॅर्ड, भद्रावती) असे आत्महत्या करणाऱ्या इसमांची नावे आहेत. महेश जुनघरे याने गुरुवारी ऊर्जाग्राम परिसरातील रेल्वे लाइनवर आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही, तर दुसऱ्या घटनेमध्ये शुक्रवारी गजानन गाताडे (रा. विजासन, नेताजी वाॅर्ड) याने विजासन परिसरातील रेल्वे लाइनवर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. हा मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होता. पोलिसांनी दोन्ही घटनांचा पंचनामा केला. पुढील तपास कॉन्स्टेबल विजय नागपूरकर करीत आहेत.