ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. मृताची नावे लता भाऊराव डोईजड (रा. नागभीड) आणि विक्की मारोती चिकणकर (रा. सोनेगाव) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील लता भाऊराव डोईजड (रा. नागभीड) या महिलेने ब्रह्मपुरी- आरमोरी पुलावरून पाण्यात उडी घेतली तर ब्रह्मपुरी- वडसा पुलावरून विक्की मारोती चिकणकर (रा. सोनेगाव) याने सायंकाळी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
मृतक विक्की चिकनकर हा युवक ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी आहे. तीन महिन्यांआधी त्याचे लग्न झाले होते. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ब्रह्मपुरी-वडसा वैनगंगा नदी पुलावर दुचाकी पुलाच्या कडेला ठेऊन त्याने नदीत उडी घेतली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
लता डोईजड येथील नगभीड येथील रहिवासी असून ब्रह्मपुरी-आरमारी वैनगंगा नदीच्या पुलावरून सोमवारी दुपारी १ ते २ दरम्यान उडी मारली. ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. ती सकाळी घरी कुणालाही न सांगता निघून गेली होती. घरच्यांनी शोधाशोध केली असता आरमोरी-ब्रह्मपुरी पुलावर चपला व चिठ्ठी मिळून आल्याची माहिती आहे. बचाव पथक इतरत्र व्यस्त असल्याने पोहोचले नाही. बुधवारी बोटीसह बचाव पथक येणार असल्याची माहिती उपविभागीय ( महसूल ) अधिकारी भस्के यांनी ‘लोकमत’ला दिली.