बाळू धानोरकर यांची माहिती : जीएमआर व साई वर्धा पॉवर कंपनी घेणार पुढाकारवरोरा : नगर परिषदेच्या वतीने ३२ कोटी रुपये खर्चून नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेला पालिका फंडातून भरावे लागणारे दोन कोटी रुपये साई वर्धा व जीएमआर एम्को कंपनी देणार आहे. यासोबत दोन्ही कंपन्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या असल्याचे पत्र दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार बाळू धानोरकर यांनी दिली.वरोरा शहरानजीकच्या मोहबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकरी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु कंपन्या सर्वसामान्यांना कुठल्याही सोयी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप आमदार बाळू धानोरकर यांनी करीत २१ जुलै रोजी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. कंपनीच्या प्रतिनिधींनी आमदार धानोरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व चर्चा केली. त्यात जीएमआर कंपनीने वरोरा शहरात नव्याने होऊ घातलेल्या ३२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला नगर परिषद फंडातून आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनास भरावी लागणारी रक्कम निधीच्या उपलब्धतेनुसार एक कोटी रुपयांपर्यंत नगर परिषद फंडात जमा करण्यात येईल. कंपनीच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंपनीच्या माध्यमातून नुकसान झाल्यास एक महिन्याच्या आत पाहणीे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल. वरोरा शहरात दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येईल, आमदार यांना विश्वासात घेऊन सीएमआर फंडातून होणाऱ्या विकास कामाचा आराखडा तयार करणार, कंपनी परिसरात २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या तरुणांना आवश्यक ते तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या उपलब्धतेनुसार रोजगार देण्यात येईल, वरोरा नगर परिषदेला स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यात येईल, ग्रामीण भागात स्कूलबस देण्यात येणार, सिंचनाकरीता बंधारे बांधताना कंपनीच्या वतीने जेसीबी मशीन व डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल, स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी उभारण्यात येईल, उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे तीन महिन्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.साई वर्धा पॉवर कंपनीच्या वतीने नगर परिषद पाणीपुरवठा योजनेस एक कोटी रुपये निधीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहेत. कंपनीकडून शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आमदार धानोरकर यांना विश्वासात घेऊन सी.एस.आर फंडातून होणाऱ्या विकासकामाचा आराखडा तयार करणार आहे. कंपनी परिसरातील २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या तरुणांना आवश्यक ते तांत्रिक व व्यावसायीक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या उपलब्धतेनुसार रोजगार देण्यात येईल, शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देणार, परिसरातील जनावरांकरिता पशुुचिकित्सक उपलब्ध करून, उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शीत शवपेटी, उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्यांसाठी साहित्य पुरविण्यात येईल. तसेच वरोरा नगर परिषदेला एक पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदी मागण्या जी.एम.आर. एम्को कंपनी व साई वर्धा पॉवर कंपनीच्या प्रतिनिधींना मान्य केल्याची माहिती आमदार धानोरकर यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंंडे, नगरसेवक राजू महाजन, पुरुषोत्तम खिरटकर, सुरेश पचारे, किशोर उत्तरवार, खेमराज कुरेकार, नीलेश भालेराव, सुभाष दांदडे, बाळू चिंचोलकर, अशोक निगम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)चार्ज थ्री-जीचा, सेवा मात्र टू-जीची !चंद्रपूर : बहुतांश खासगी मोबाईल कंपन्यांची जिल्ह्यात थ्री-जी सेवा उपलब्ध नसली तरी थ्री-जी सेवा असल्याचा दावा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात थ्री-जी सेवा नसल्याने टू-जी सेवा उपलब्ध करून देऊन ग्राहकांची लूट चालविली जात आहे. स्मार्ट फोन ही आता केवळ चैनीची वस्तू राहिली नसून ती आजच्या बदलत्या युगाची गरज बनली आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून विविध कामे करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी व इंटरनेट स्पीड असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेटस्पीड प्राप्त व्हावी यासाठी थ्री-जी सेवा असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्यांनी मोबाईल टॉवर उभारले आहेत. या टॉवरवर केवळ टू-जी सेवेची यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र थ्री-जी सेवा उपलब्ध असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे ग्राहक थ्री-जीचा इंटरनेट रिचार्ज मारीत आहेत. प्रत्यक्षात मात्र थ्री-जी सेवेची यंत्रणा नसल्याने ग्राहकांना टू-जीची स्पीड उपलब्ध होते. पैसे मात्र थ्री-जी घेतले जातात. ही ग्राहकांची एक प्रकारची लूट सुरू आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी
By admin | Published: July 23, 2015 12:47 AM