शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:08 AM

पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले.

ठळक मुद्देअनेक दिवस दडी : दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले. बहुप्रतीक्षेनंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. सायंकाळच्या सुमारास काळेकुट्ट आभाळ होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी थोडाफार सुखावला आहे. मात्र जिल्ह्यावरील भीषण दुष्काळाचे संकट टळण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस फारच कमी आहे. पावसाळ्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जलसाठ्या बºयापैकी पाणी जमा होते. मात्र यावेळी संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. शेतकºयांनी जगावे की मरावे एवढी शेतकºयाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच आशेवर शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकºयांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकºयांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुºया पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकºयांना बसला आहे.जुलै महिन्यात विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो फोल ठरला आहे. हवामान खात्याचा अंदाज वारंवार फोल ठरत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. ९० टक्के शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. १० टक्के पेरण्या अद्यापही शिल्लक आहे. पाऊस वारंवार दगा देत आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने मागील सोमवारी जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. दरम्यान, आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक ढग जमून आले आणि पाऊस बरसला. हा पाऊस बºयापैकी पडल्याने शेतकºयांना पीक वाचविण्यास मदत होणार आहे. मात्र पुढे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच.प्रकल्पात अजूनही ठणठणाटजुलै महिन्यातच पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पात पाहिजे तसा जलसाठा संकल्पित होऊ शकला नाही. केवळ आसोलामेंढा प्रकल्पात ५७ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पात तर ४० टक्क्याहून कमी जलसाठा असल्याने पुढे पाण्याची मोठी टंंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पकडीगुड्डम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. लभानसराड प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणाची स्थितीही चिंताजनक आहे.