जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारात एकूण २३५ बसेस लॉकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५०० ते ६०० फेऱ्या होत होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. परंतु, लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर निम्म्या बस धावू लागल्या. दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत होते. मात्र मागील काही दिवसांपासून ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यातच शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला आहे.
बॉक्स
दोन दिवसांत ८० हजार किमीचा प्रवास रद्द
जिल्ह्यातील चारही आगारातून सुमारे ८० हजार किमीपर्यंत बसफेऱ्या धावत होत्या. त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते. मात्र वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी केवळ २९ हजार किमी अंतर बस धावली. ४९ हजार किमी अंतराच्या बस रद्द करण्यात आल्या. त्यातून महामंडळाला सहा लाख ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. रविवारी १३ हजार किमी बस धावल्या. ६६ हजार किमी अंतराच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाला केवळ तीन लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन दिवसांत केवळ महामंडळाला नऊ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असले तरी लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.
बॉक्स
कर्मचारीही कमी
शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बहुतांश कर्मचारी सुटीवर होते. तर जेवढे शेड्यूल होते तेवढे कर्मचारी कामावर होते. नेहमी वाहनचालक व वाहक यांच्या दोनवेळा ड्यूटी लावण्यात येत होत्या. मात्र या वीकेंड लॉकडाऊनला बसफेऱ्या कमी असल्याने एकच ड्यूटी लावण्यात आली होती.
-----
बॉक्स
२३५ आगारातील एकूण बसेसची संख्या
१४६ दोन दिवसांत धावलेल्या बसेस
९९०००० पैसे मिळाले दोन दिवसांत