चंद्रपूर : जिल्ह्यात वनविभागाकडे ३ हजार नोंदणीकृत बुरड समाजाची संख्या आहे. या व्यतिरीक्त नवीन बांबु धोरणा अंतर्गत नवीन बुरड समाजाची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. या बुरड समाजाला सन २०१३-१४ मध्ये २२७५ बुरड लाभार्थ्यांना ७२ हजार ७० व सन २०१४-१५ मध्ये मे अखेरपर्यंत १३४८ बुरड लाभार्थ्यांना ५७ हजार ३९७ हिरव्या लांब बांबुचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. सद्या स्थितीत बांबू व्यवसाय करणारे कारागिर पारंपारीक पध्दतीचा वापर करुन ताटवे, सुप व टोपल्या इत्यादी वस्तु तयार करतात. मात्र त्यांना त्यांच्या मेहनतीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. तथापी बांबूचा उपयोग विविध हस्तकला, बांधकामाचे साहित्य, फर्निचर व शेती उपयोगी अवजाराकरिता सुध्दा होतो. याबाबत बांबूच्या उत्पादनामध्ये व बांबूवर आधारित उद्योग तयार करणे, बांबूचा मुल्यवर्धीत वाढविणे करीता राज्य शासनाने ४ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये ऐतिहासीक निर्णय घेवून बांबू धोरण जाहीर केले. त्या धोरणाअंतर्गत खाजगी जमिनीवर विविध प्रजातीच्या बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, खाजगी जमीनीवरील बांबू उत्पादनास वाहतूकीतून मुक्त करणे तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व बुरड कारागिरांना पुरवठा करण्यात येत असलेल्या बांबूवरचे स्वामीत्व शुल्क व वनविकास कर न आकारता पुरवठा करणे, या बाबीचा समावेश शासन निर्णयात केलेला आहे.वनविभागामार्फत राज्यात शास्त्रोक्त पध्दतीने बांबू लागवड व औद्योगीक वापरासाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्राची चिचपल्ली येथे स्थापन करण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. मात्र जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्यालगत बांबू प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने बांबु कारागिर वंचीत राहिले आहे. पयार्याने पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. त्या करीता चिचपल्ली येथे शास्त्रोक्त पध्दतीने बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण व प्रसार करण्यासाठी केंद्र स्थापन केल्यामुळे बांबू कारागिरांना पुरवठा करण्यात आलेल्या स्थानिक प्रजातीच्या व्यतिरीक्त विविध हस्तकला तयार करण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक बांबूच्या प्रजातीची लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बांबू कारागिरांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)बांबू प्रकल्पासाठी शासनाकडून प्रयत्न३५ कारागिरांना प्रशिक्षण२०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील १५ बांबू कारागिरांना विविध हस्तकला तयार करण्याचे आगरतला येथे प्रशिक्षण देण्यात आलेले असून २० प्रशिक्षणार्थी पुन्हा आगरतला येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षीत बांबू कारागिरांनी तयार केलेल्या फर्निचर व इतर हस्तकलाचे प्रदर्शन नुकतेच जिल्हा उद्योग भवन व एनडीए हॉटेल चंद्रपूर येथे प्रदर्शित केले आहे.कारागिरांना होणार फायदाप्रशिक्षण घेवून आलेल्या बांबू कारागिरामार्फत ५ जुलै २०१५ पासून वनअकादमी चंद्रपूर येथे २० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ५ व ६ जुलै रोजी घेण्यात आलेल्या दोन दिवसीय बांबु चर्चासत्राच्या माध्यमातून बांबु हफ, बांबु पार्क तयार करणे व बांबु उद्योगाला इंडस्ट्रिजचा दर्जा देणे इत्यादीमुळे निश्चितच जिल्ह्यातील बुरड आदिवासी व बांबू कारागिरांना नवीन संधी उपलब्ध होवून फायदा होईल.
दोन वर्षांत सव्वा लाख बांबूंचा पुरवठा
By admin | Published: July 09, 2015 12:55 AM