शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

दोन किलोमीटरचा मार्ग विद्यार्थ्यांनी केला जलमुक्त

By admin | Published: September 18, 2016 12:49 AM

कोरपना तालुक्यातील अतीदुर्गम आदिवासी भागात असलेल्या धानोली येथील शारदा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श घडविला आहे.

श्रमदानातून काढले साचलेले पाणी : शारदा महाविद्यालयाचा समाजापुढे आदर्शविजय आंबेकर वनसडीकोरपना तालुक्यातील अतीदुर्गम आदिवासी भागात असलेल्या धानोली येथील शारदा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श घडविला आहे. सतत पडणाऱ्या पावसाची माधाफाटा ते येरगव्हाण या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. तो विद्यार्थ्यांनी दोन कि.मी.पर्यंत जलमुक्त केला.कुसळ, धानोली, तांडा, येरगव्हाण, बोरगाव, कमलापूर, कारगाव, मरकागोंदी, धनकदेवी, जिवती, घाटराई आदी ठिकाणी संपर्कासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे सतत या मार्गाने वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. परंतु रस्त्याची बिकट अवस्था पाहून प्रवाशांना या मार्गानी जाताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते.धानोली तांडा येथे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत वर्ग असलेली एकमेव शाळा असून परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या शाळेत जाता- येताना दिसते. पावसाळ्यात रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचे पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडून नाहक त्रास सहन करावा लागत असतो. परिणामी संपूर्ण गणवेश अस्वच्छ होऊन घरी परत जाण्याची वेळ कित्येक विद्यार्थ्यांवर यायची. त्यावर पर्याय म्हणून रस्त्यावर साचलेले पाणी जर काढले तर त्यातून विद्यार्थी सुखरूप शाळेत येईल, असे शाळेच्या प्राचार्य कुबडे यांना वाटले. त्यांनी आपली कल्पना प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांनीसुद्धा तयारी दर्शविली व धानोली तांडा ते धानोली या दोन कि.मी.पर्यंत काढून टाकले. पुढेही ही संकल्पना राबवून १० कि.मी.चा रस्ता जलमुक्त करू, असे आश्वासन दिले. विद्यार्थी श्रमदानातून साचलेलेपाणी काढत असताना येणाऱ्या जाणारे प्रवाशी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत होते आणि चांगल्या कामाची पावतीही देत होते.महाविद्यालयाचे समाजाप्रती असलेले सामाजिक बांधीलकीचे नाते या महाविद्यालयांने प्रत्यक्षात अमलात आणल्याने माजी उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष भाऊजी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा श्रमदानात सहभागी झाले. सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या या महाविद्यालयाची दखल विद्यमान सरपंच विजय रणदिवे यांनी घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व महाविद्यालयाची प्रशंसा केली.माझे व माझ्या महाविद्यालयाचे समाजाप्रती असलेले सामाजिक बांधीलकीचे नाते हे केवळ बोलण्याने चालत नाही तर ते प्रत्यक्षात कृतीने दिसलेपाहिजे आजपर्यंत आम्ही असे अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जोपासत आहो.- पी.एस. कुबडे, प्राचार्य, शारदा कनिष्ठ महा. धानोलीआम्ही रोज महाविद्यालयात पायी चालतच येत असतो आणी पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने आमचे खुप हाल होत असत. श्रमदानातून ती समस्या निकाली निघाल्याचा आनंद आहे.- सोनाली रा. राठोड, इयत्ता १२ वी, शालेय मुख्यमंत्री